चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून ऑनलाइन अभ्यासक्रमाकडे अधिक लक्ष दिले जात आहे. मात्र बहुतांश जणांना मोबाइलचे पाहिजे तसे ज्ञान नसल्याने अनावश्यक मेसेजही व्हायरल केले जात आहे. त्यामुळे नको तो गोंधळ क्लासमध्ये होत आहे. मोबाइल वापरण्याच्या अज्ञानामुळे मेसेज ग्रुपवर व्हायरल झाल्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत. मोबाइलवरील अनावश्यक मेसेजमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही आता त्रस्त झाले आहेत.
बाॅक्स
शाळांनी ही घ्यावी काळजी
सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन क्लास सुरू आहे. शाळांनी त्यांच्या वर्गनिहाय अभ्यासक्रमाची लिंक ग्रुपवर शेअर करताना ग्रुपच्या बाहेरील किंवा विद्यार्थ्यांचे पालक सोडून इतर कुणीही जाॅइन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ती लिंक ऑनलाइन क्लास सुरू होण्याच्या पूर्वीच ग्रुपवर सेंड करावी व पालकांनाही सूचना देऊन ही लिंक इतर ग्रुपवर किंवा इतरांना शेअर करू नये, अशा सूचना द्याव्यात. त्यामुळे नको ते मेसेज व्हायरल होणार नाहीत.
बाॅक्स
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
अनेकवेळा पालक आपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांना ऑनलाइन क्लास जोडून देत पालक त्यांची कामे करतात. अशावेळी मुले क्लास सोडून मोबाइलमधील गेम खेळणे, तसेच कार्टून पाहत असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच दक्ष होऊन मुले मोबाइलवर काय करतात, हे बघणेही गरजेचे आहे.
बाॅक्स
असेही घडू शकते
हातात मोबाइल दिल्यानंतर मुले ऑनलाइन क्लासव्यतिरिक्त इतरही ॲप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतात. मोबाइलच्या माध्यमातून विविध शिकण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा मुले मोबाइलवर आलेल्या खोट्या मेसेजलाही बळी पडण्याची शक्यता आसते. त्यामुळे पालकांनी वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.