लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना सत्र २०१८- १९ साठी मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ नोव्हेेंबर रोजी प्रारित केले आहे.दरवर्षीच असमानी व सुलतानी संकटाना शेतकºयांना पुढे जावे लागते. त्यामुळे शासनाने यावर्षी महा मदत प्रणालीतर्फे दुष्काळासाठी मुल्यांकन केले. त्यानुसार ट्रिगर दोन नुसार महाराष्ट्रातील सुमारे १८० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १० तालुक्याचा समावेश आहे. दुष्काळगस्त तालुक्यांना विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वनविभागाने नुकताच घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळसदृश्य १८० तालुक्यांतील शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यार्थ्यालयीन विद्यार्थ्यांना सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक सत्रासाठी १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे.शहरी भागासाठी अनुज्ञेय नाहीसदर योजना १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ या सत्रासाठी लागू आहे. मात्र ही पास नुतणीकरण करणाऱ्यांना केवळ ग्रामीण बससेवेकरिता अनुज्ञेय राहणार तर शहरी बससेविकरिता ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.पूर्वीच्या पासधारकांनाही लागूराष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मासिक पासात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत होती. मात्र आता दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास नुतनीकरण करताना उर्वरीत ३३.३३ टक्के रक्कमही सुट देण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:04 PM
नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समावेश आहे.
ठळक मुद्देदहा तालुक्यांचा समावेश : रा. प. महामंडळाचा निर्णय