पालकमंत्र्यांचे प्रयत्न : प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा आदेश चंद्रपूर : जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र वनपरिक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १८ एप्रिल रोजी जारी केला आहे. त्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले. मूल तालुक्यातील पोंभुर्णा तालुक्यालगतची काही गावे आणि संपूर्ण पोंभुर्णा तालुक्यातील गावे बल्लारपूर तालुक्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात समाविष्ट होती. पोंभुर्णा ते कोठारी हे अंतर मोठे असल्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे नव्हते. त्याचप्रमाणे वन विभागाशी संबंधित कामांसाठी विशेषत: वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानाची भरपाई मिळण्याच्या प्रकरणांसाठी शेतकऱ्यांना कोठारी येथे जाणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्?यासाठी स्वतंत्र वनपरिक्षेत्राची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. वनमंत्री मुनगंटीवार यांनी नागरिकांना स्वतंत्र वनपरिक्षेत्राची निर्मिती करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र वनपरिक्षेत्राची निर्र्मिती करण्यात आली आहे. कोठारी वनपरिक्षेत्रात बल्लारपूर, गोंडपिपरी, मूल तालुक्यातील काही गावे आणि संपूर्ण पोंभुर्णा तालुका समाविष्ट होता. आता स्वतंत्र पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात पोंभुर्णा तालुका आणि मूल तालुक्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील वनवैभवाचे जतन करत पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वनमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २ कोटी ८३ लाख रुपये किंमतीच्?या इको पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. या इको पार्क मध्ये निसर्ग निर्वाचन केंद्राच्या बांधकामासाठी ६० लाखांच्या आराखड्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र वनपरिक्षेत्र
By admin | Published: April 20, 2017 1:38 AM