कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. परंतु, ज्येष्ठांना कोरोना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने ६० वर्षावरील तसेच बीपी शुगर असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून नोंदणी केली जाणार आहे.
बॉक्स
नोंदणीबाबत संभ्रम
१ मार्चपासून नोंदणी होणार असली तरी आरोग्य प्रशासनाकडे यासंदर्भात अद्यापही पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही नोंदणी कशी करायची, याबाबत कुठल्याही सूचना नसल्याने नोंदणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
बॉक्स
पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आल्यानंतर आता ६० वर्षांवरील तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून नोंदणी केली जाणार आहे.
बॉक्स
पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या योद्ध्यांना अजूनही लस देणे सुरुच आहे. विशेष म्हणजे काहींचा पहिला डोस पूर्ण झाला असून दुसरा डोस दिल्या जात आहे. तर शासकीय कर्मचाऱ्यांना विविध आरोग्य केंद्रात पहिल्या टप्प्यातील लस देणे सुरुच आहे.
बॉक्स
जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, उपजिल्हा रुग्णालय राजुरा, नागरी आरोग्य केंद्र, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय, चिमूर उपजिल्हा रुग्णालय, मूल उपजिल्हा रुग्णालय, सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय, कोरपना ग्रामीण रुग्णालय, सावली ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय, नागभीड ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती, पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस हॉस्पिटल चंद्रपूर.
बॉक्स
खासगी रुग्णालय
मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर, मुसळे चिल्ड्रन हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, बुक्कावार हॉर्ट ॲन्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल, गाडेगोने ऑर्थेपेडिक हॉस्पिटल, क्राइस्ट हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, ख्रिस्तानंद हॉस्पिटल चंद्रपूर,