लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच-सहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले, तलाव तुडुंब भरले आहे. शेतातील बांद्यांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस व धान पºह्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाऊस उसंत घेत नसल्याने मागील पाच दिवसांपासून शेतीची कामे जवळजवळ बंदच आहे. एकूणच पावसामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.यावर्षी पावसाला उशिराने सुरूवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला. त्यानंतर चार-पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. मात्र पुढे पावसाने दडी मारली. तब्बल २२ दिवस पाऊस आलाच नाही. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला. तेव्हापासून आज २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. प्रारंभी जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत असतानाच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. त्यानंतर पाऊस आला आणि बºयाच शेतकऱ्यांनी थांबविलेल्या पेरण्या पूर्ण केल्या. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील शेतकºयांनी पºहे टाकले आहे. मात्र आता संततधार पाऊस येत असल्यामुळे शेतातील बांद्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेकजणांचे पºहे पाण्याखाली आले आहेत.जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत यापैकी कोणत्याही नद्यांमध्ये पूरस्थिती नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक मार्गावरून वाहणाºया नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही मार्ग बंद झाले आहेत. वरोरा तालुक्यातील चारगाव धरण १०० टक्के भरल्यामुळे इरई नदीच्या पात्रात पाणी वाहून इरई धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. खबरदार म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र व्यवस्थापनाने गुरुवारी दुपारी इरई धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडले होते. दरम्यान आज शुक्रवारी सकाळपासूनच संततधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी रात्रभरही पाऊस सुरूच होता. या पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात रेलचेल मंदावली आहे. शेतात जाता येत नाही, मजुरीची कामे बंद आहेत, त्यामुळे शेतमजूर, शेतकरी घरात स्वस्थ बसलेले दिसत आहे.इरई धरण तुडूंब भरले दोन दरवाजे उघडलेदुर्गापूर: संततधार पावसाने इरई धरण तुडूंब भरले असून धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने काल सायंकाळी ४.३० वाजता उघडण्यात आले आहेत. चारगाव धरणाचा ओव्हरफ्लो सुरु असल्याने धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आज शुक्रवारीही इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडले होते. उन्हाळ्यात इरई धरणाने २०३.४७४ मीटर एवढी निम्न पातळी गाठली होती. पावसाच्या हुलकावणीने धरण तुंडूब भरेल की नाही अशी साशंकता होती. मात्र जुलै महिन्याच्या अखेरीपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने अखेर इरई धरण तुडूंब भरले आहे. चारगाव धरणाचा ०.२४ सेंटीमीटरने ओव्हरफ्लो सुरु आहे. त्याचेही पाणी इरई धरणात येत आहे. त्यामुळे इरई धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी धरणाने २०७.१५० मीटर एवढी पाण्याची पातळी गाठल्यावर सायंकाळी ४.३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहे. तरीही धरणाची पातळी वाढतच आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री पुन्हा तिसरा दरवाजा ०.२५ मीटरने उघडला. नदीकाठी असणाºया गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अनेक रस्ते उखडलेकोरपना तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर- आदिलाबाद, कोरपना - वणी, गडचांदूर- भोयगाव रस्त्यासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते उखडले आहे. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यावरील खडयात पाणी भरले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यावर तर चिखलाचे अक्षरश: साम्राज्य तयार झाले असल्याने ग्रामीणांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे याचा फटका कोरपना येथे येणाº्या बाजारकरूना मोठया प्रमाणात बसला. पावसामुळे बाजारात आवकही कमी दिसून आली.निंदण, खत पेरणी रखडलीकोरपना : रविवारपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने कोरपना तालुक्यातील शिवारातील शेतीची कामे रखडून पडली आहे. तसेच पावसामुळे परिसरातील नदी, नाले, तलावही तुडुंब भरले आहे. पावसाच्या रिपरिपमुळे शेतमजूरही येत नसल्याने निंदण, खत पेरणीचे काम लांबणीवर पडत आहे. तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नदीचा जलस्तर दिवसेंदिवस वाढत चालला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ही सज्ज करण्यात आली आहे.आपत्ती नियंत्रण कक्ष सज्जजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये डब्लूसीएल व सीटीपीएस येथील आपत्ती नियंत्रणासाठी काम करत असलेल्या कर्मचाºयांचे शोध व बचाव पथक तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.चिमूर तालुक्यात ओला दुष्काळसदृश स्थितीचिमूर : चिमूर तालुक्यात मागील चार दिवसांच्या संततधार पावसानंतर काही तासाची उसंत देत आज शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चिमूर तालुक्यात आणखी चार दिवसांपूर्वीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही तासाच्या उसंतीनंतर शेतकºयांनी धान रोवणीला जोर धरला असला तरी सततच्या पावसाने तालुक्यातील कापूस,सोयाबीन पिकांना चांगलाच मार बसत आहे. या सततच्या पावसाने तालुक्यात ओला दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आणखी पाऊस असाच सुरू राहिल्यास चिमूरपासून पिपर्डा,हिंगणघाट, पिंपलनेरी, मूरपार, भानसुली या गावासह काही गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतात साचले पाणीखडसंगी : परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खडसंगी परिसरातील शेतात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून याचा मोठा फटका शेतकºयांना बसत आहे. परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस शुक्रवारीही कायम होता. यामुळे अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत शेतात कापूस, सोयाबीन यासारखी खरीप पीक असून धान रोवणीला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पावसाचे पाणी साचून असल्याने सोयाबीन,कापूस उत्पादक शेतकºयांनाा मोठा फटका सहन करावा लागत आहे. मागील आठवडाभरापसून शेतात पाणी साचले असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.