लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसने केले.शंकरपूर-डोमा जि.प. क्षेत्रातील गावात भारनियमन सुरू असल्याने शेतकरी व व्यापारी वर्ग चिंताग्रस्त आहेत. शेतकºयांचे धान, सोयाबीन, कापूस, मिरची हे मुख्य पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दिवसा सिंगल फेज व रात्री अल्पकाळ थ्री फेज वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी व्यवस्थित सिंचन करू शकत नाही. २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू करावा, थकबाकीदार शेतकºयांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, आदी मागण्यांसाठी शेकडो शेतकºयांनी आज शुक्रवारी मोर्चाच्या स्वरुपात वीज वितरणचे कार्यालय गाठले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात वरोरा उपविभागीय अभियंता राठी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात पं.स. सदस्य रोशन ढोक, भावना बावनकर, दक्षा भगत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माधव बिरजे, चिमूरचे नगरसेवक विनोद ढाकूणकर, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविता चौधरी, डॉ. विजय गावंडे, नंदकिशोर गावंडे, अमोद गौरकर आदी सहभागी झाले होते.
शेतकºयांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:14 AM
भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसने केले.
ठळक मुद्देशेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक