लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा येथील अत्याचार प्रकरणी कॉग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजुऱ्यात मोर्चा तर चंद्रपुरात निदर्शने देण्यात आली.आम आदमी पार्टीतर्फे बुधवारी चंद्रपुरात जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली. निर्लज्ज वक्तव्य करणाऱ्या नेत्याविरुध्द अॅक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने सरसावले, असे म्हणणे म्हणजे कॉग्रेस नेत्यांच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याची टीका आपने केली. यावेळी आपचे योगेश आपटे, सुनील मुसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, सुनील भोयर, अशोक आनंदे, परमजित झगडे, ताहीर शैख, अजय डुकरे, सपना विशवकर्मा, सिकंदर सागोरे, शंकर धुमाळे, बबन क्रिष्णापल्लीवार, दिलीप तेलंग, दुलाल बक्षी आदींची उपस्थिती होती.कठोर कारवाई कराराजुरा : राजुरा येथील वसतिगृहातील अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, बेताल वक्तव्य करणाºया काँग्रेस नेत्यावरही कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजपा-शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला व निषेध नोंदविला. यावेळी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, शिवसेनेचे नितीन पिपरे, नगरसेवक उज्ज्वला जयपूरकर, राधेश्याम अडानिया, रेखा देशापंडे, अरुण मस्की, सचिन डोहे, मोहन कलेमुरवार, सतीश धोटे, विनायक देशमुखव कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आदिवासी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी भारत आत्राम, मडावी, घनश्याम मेश्राम, तुळशिराम किन्नाके, उद्धव कुळसंगे, संतोष कुळमेथे, खुशाल परचाके व आदिवासी बांधव उपस्थित होते.
राजुऱ्यात मोर्चा, चंद्रपुरात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:05 AM