लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. परिणामी त्यांचे बजेट कोलमडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये सरकारविरुद्ध रोष व्यक्त होताना दिसून येत आहे.आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकांच्या घरी चारचाकी किंवा दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाहन ही लोकांची अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. पूर्वी ५० ते ६० रुपयाला मिळणारा एक लिटर पेट्रोलचे दर आता ९० पार झाले आहे. तर ग्रामीण भागात यापेक्षा अधिक दराने पेट्रोलची विक्री करण्यात येत आहे. तर काही दिवसांत पेट्रोल शंभरी गाठतोय की, काय अशी प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहे.काळानुरुप वाढत्या महागाईने पेट्रोल -डिझेल वाढ अटळ आहे. मात्र यावक अंकुश असणे गरजचे आहे. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.सोशल मीडियावर टिकापेट्रोल डिझेल वाढीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु आहे. अनेकांनी पेट्रोल महागाईमुळे दुचाकीने आत्महत्या केल्याचे कार्टुन अपलोड केले आहे. तर अनेकांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पेट्रोल वाढीवर आपला राग व्यक्त केला आहे.टिकीट भाड्यामध्ये वाढपेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे महामंडळाने टिकीटमध्ये वाढ केली. त्याचबरोबर खासगी वाहनांनी तसेच आॅटोरिक्षांनी वाढ केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल वाढीचा फटका वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे.वाढ रुपयांनी, कमी पैशानेमागील काही वर्षांपासून प्रत्येक महिन्यांत दोन ते तीन रुपयांनी पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जाते. त्यानंतर लोकांच्या आरडाओरडानंतर १० ते २० पैशांनी पेट्रोल व डिझेलची किंमत कमी करण्यात येते.
इंधन दरवाढीचा वाहनचालकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:00 PM
दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. परिणामी त्यांचे बजेट कोलमडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये सरकारविरुद्ध रोष व्यक्त होताना दिसून येत आहे.
ठळक मुद्देसरकारविरुद्ध रोष : दरवाढ कमी करण्याची मागणी