शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

गोसीखुर्द वितरिकांची कामे मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 10:49 PM

गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देटेंडर होऊनही कामास विलंब : सिंचनासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.जनकापूर ते विहीरगाव शेत सर्व्हे क्र. २०० पर्यंत गेल्या चार वर्षापूर्वीपासून बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या खरीप पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. कालव्याचे बांधकाम झाले नसल्याने या परिसरातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून लोकवर्गणी व स्थानिक आमदारांच्या सहयोगातून अर्धवट राहिलेल्या उपकालव्याचा आधार घेत पाणी घेऊन शेतातील पीक वाचवित आहेत. विशेष म्हणजे, धानपिक जगविण्यासाठी पाणी दिल्यास संबधित विभागाला पाण्याचे मागणी बील सुद्धा देण्याचे शेतकºयांनी मान्य केले आहे. असे असले तरी हक्काचे पाणी शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही.विहिरगाव, कसरगाव, गेवराखुर्द, मंगरमेंढा या परिसरातील शेतकरी गोसेखुर्दच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित गोसीखुर्द प्राधिकरणाकडून सावली तालुक्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात उपकालवे व वितरीकेचे कामे प्रगतीवर आहेत. मात्र गेवरा परिसरातील १० ते १५ गावात अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरुपात बांधकामांचा अंदाज नसल्याने शेतकºयांकडून संबंधित विभागाला सातत्याने विचारणा केली जात आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यासंदर्भात संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून माहिती घेतली असता, जनकापूर ते विहिरगाव दरम्यान बी पाच सर्व्हे क्र. २०० च्या पुढील कामे बंद पाईप लाईनद्वारे कामे केले जाणार आहे. त्याबाबत कार्य करणाºया यंत्रणेला निवीदा मंजूर करण्यात आल्या.सदर कंपनीकडून कामाचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक डिझाईन व नियोजन प्रक्रियेनंतर पुढील कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी या भागात सिंचनाची व्यवस्था चिंतेची बाब आहे.याभागात आजतागायत कुठलीही कायमस्वरुपी ठोस सिंचन व्यवस्था नसल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला बळी ठरत आहे. त्यामुळे येथील उपकालव्याचे काम त्वरित करून संकटात सापडलेल्या शेतकºयांनी दिलासा देण्याची मागणी आता जोर धरत आहे.शेतकरी दुबार पेरणीपासून वंचितएकेरी पीक पद्धतीत अडकलेल्या या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेने दुबार पिके घेता येऊ शकते. मात्र यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत पुढील कामांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अन्य भागात सुरु असलेल्या वितरीका आणि उपकालवे बांधकामाच्या प्रगतीवरुन या भागातील प्रत्येक गावातून शेतकरी चिंतेत असून काम त्वरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.