शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

प्रत्येक बाधित गावाला निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:39 AM

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्याला प्राप्त निधीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.जिल्ह्यातील नगर आयुक्त, मुख्याधिकारी व ग्रामपंचायत सरपंचांनी याबाबत अत्यंत जागरूक राहून आपल्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी गावाच्या गरजेनुसार आपले प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे अंदाजपत्राकांसह सादर करावे, अशी सूचना ना. अहीर यांनी केली. बाधित क्षेत्रामध्ये शुध्द पिण्याचे पाणी ही मोठी गरज असून आर. ओ. वॉटर एटीएम बाधित गावात लावण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.बाजार ओट्यांचे सौंदर्यीकरण, शाळा, ग्रा.पं., ग्रामीण पाणीपुरवठा यासारख्या स्थानिक उपक्रमात सोलर विद्युत व्यवस्था करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले. पांदण रस्त्याचा मोठा प्रश्न असून खनिज विकास अंतर्गत पांदण रस्ते घेण्याची मोठी संधी बाधित गावांना उपलब्ध आहे, याची याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले.हा निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्यास प्रत्येक बाधित व अप्रत्यक्ष बाधित गावांना व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निधी वाटप केल्यास तो न्यायोचित ठरेल, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी दिली असून त्याचा सर्वात जास्त लाभ चंद्रपूर जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे अधिकाºयांनी नियमानुसार आराखडयात कामे समाविष्ट करावीत, असे निर्देश दिले.या बैठकीला आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, महापौर अंजली घोटेकर, चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले, अधीक्षक अभियंता, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर