शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

निधी मिळाला १.६४ कोटी, खर्च मात्र २८ लाख

By admin | Published: October 03, 2015 12:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे.

खासदारांच्या दत्तक गावाला अखर्चित निधीचा अडथळाचंदनखेड्यात करायची होती ६९ कामे : अनेक कामांसाठी निधीची तरतूदच नाहीगोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूरचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाला चंदनखेड्यामध्ये अखर्चित निधीचे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षभरात या दत्तक गावाच्या विकासासाठी ६९ कामांकरिता १३ कोटी ४८ लाख ६४ हजार रूपयांची मंजुरी मिळाली असली तरी निधी मात्र १६४ कोटी रूपयांचाच मिळाला आहे. त्यातही फक्त २८ लाख ४५ हजार रूपयांचीच कामे या गावात आजवर झाली आहेत. निधी येऊनही तो खर्च न होण्यामागे असलेल्या उदासिन मानसिकतेमुळे या गावाचा विकास मात्र मंदावला आहे.सांसद आदर्श ग्राम योजनअंतर्गत प्रत्यक खासदारांना एक गाव दत्तक घ्यायचे होते. त्यानुसार केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी एकूण १९ विभाग आणि यंत्रणांकडून ६९ कामांची आखणी करण्यात आली होती. त्यातील आठ कामांसाठी तरतूद होऊनही निधी मिळालाच नाही. ६१ कामांसाठी १६४ कोटी रूपयांचा निधी मिळाला असला तरी, प्रत्यक्ष सात कामांवर छदामही खर्च झाला नाही. फक्त चार विभागांनीच काही कामांवर खर्च केला आहे. यामुळे लक्षवधीचा निधी मिळूनही तो शासनाच्या तिजोरीत तसाच पडून आहे.विशेष म्हणजे, मिळालेला निधी येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. हा कालावधी संपायला फक्त दोन महिने उरले असतानाही मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. चंदनखेडा हे गाव विकसनशिल आहे. या गावात विकासकामांची आवश्यक असतानाही यंत्रणा मात्र उदासिन आहे. वनविभाग, पशु संवर्धन विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग या विभागांना कामासाठी येथे बराच वाव असतानाही छदामही खर्च केलेला नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मिळालेल्या ३ लाख ७५ हजार रूपयांपैकी ३ लाख २५ हजार रूपयांचा निधी कामांवर खर्च केला आहे. केवळ या विभागातील जिल्हा परिषदेची आघाडी वगळली तर अन्य ठिकाणी जिल्हा परिषद माघारली आहे. या उदासिनतेमुळे सांसद आदर्श ग्राम योजनेला जिल्ह्यात खिळ बसण्याची शक्यता बळावली आहे.या विभागाच्या कामांना निधीच नाहीजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, बांधकाम विभाग (जि.प.), महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, लघु सिंचन विभाग (जि.प.), निधी मिळूनही खर्च शून्यजिल्हा क्रीडा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, विद्युत विभाग, पशु संवर्धन विभाग (जि.प.), प्राथमिक शिक्षण विभाग (जि.प.), कृषी विभाग (जि.प.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाझालेली कामेलघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग, आरोग्य विभाग (जि.प.), मग्रारोहयो (ग्रामपंचायत स्तर), पाणी व स्वच्छता मिशन कक्षअखर्चित निधीत जिल्हा परिषदच आघाडीवरनिधी मिळूनही तो खर्च न करण्यात जिल्हा परिषदच आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, खासदारही भाजपाचे आहेत आणि जिल्हा परिषदेत सत्ताही भाजपाची आहे. असे असतानाही निधी खर्च करण्यात पदाधिकाऱ्यांना रूची का नसावी, हा चिंतनाची विषय आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि लघु सिंचन विभागाने तर १७ कामे प्रस्तावित करूनही निधीच दिला नाही.  काम ढेपाळले हे खरे आहे. यासाठी यंत्रणा कामी लावली आहे. डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहे. या संदर्भात ३ आॅक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक ठेवली आहे.- हंसराज अहीर, केंद्रीय रसायन राज्य मंत्री