बल्लारपूर : रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्हाधिकाच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केलेल्या दारिद्र्य रेषेखालील १० व दारिद्र्य रेषेवरील २४ अशा एकूण ३४ लाभार्थ्यांना अनुदानाचा प्रथम हप्त्याचे धनादेश वितरण नगर परिषद सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हरीश शर्मा होते. तर अतिथी म्हणून नगर परिषदेच्या उपाध्यक्षा मीना चौधरी या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाला ३४ लाभार्थी उपस्थित होते. तसेच धनादेश वितरण चंदनसिंह चंदेल, हरिश शर्मा, मीना चौधरी, सचिन जाधव, विनोद यादव, जयश्री मोहुर्ले, सुवर्णा भटारकर, राकेश यादव, कमलेश शुक्ला, भावना गेडाम, महेंद्र डोके, स्वामी रायबरम, पुनम निरांजने, मिना बहुरिया, आशा संगीडवार, निशांत आत्राम, सारिका कमकम, साखरा बेगम, दासरफ येलय्या यांचे हस्ते लाभार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून धनादेश देण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी चंदनसिंह चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यापुढेही शासनातर्फे येणाऱ्या योजनेत नागरिकांनी सहकार्य करावे व लाभ घ्यावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रशासनातर्फे उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे व रमाई घरकूल योजनेचे लिपीक सतीश गोगुलवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले. तसेच शासनाचे आव्हानाअंतर्गत १०० टक्के मालमत्ता कर वसुलीमध्ये वनविकास महामंडळाकडे थकीत असलेले दोन कोटी १४ लख १२ हजार ८८१ रुपयाचा धनादेश वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या पुढाकाराने वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांच्या समक्ष नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना सुपूर्द केले. या प्रकरणात न्यायालयात नगर परिषदेच्या बाजूने निकाल लागल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची एकत्रित रक्कमप्राप्त झाली. (शहर प्रतिनिधी)
रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना निधी मंजूर
By admin | Published: April 03, 2017 2:07 AM