लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान येथील दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. किमतीच्या पर्यटन विषयक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी सभागृहाचे बांधकाम व मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीच्या पूर्ततेसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. निधी मंजूर केला आहे. मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण यासह एका सभागृहाचे बांधकाम, असे या एकूण विकासकामांचे स्वरूप आहे. सन २०१८-१९ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सदर विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, पंचायत समिती व तहसिल कार्यालयाची नुतन इमारत, बांबु हॅन्डीक्रॉफ्ट अॅन्ड आर्ट युनिट, टूथपिक उत्पादन केंद्र, ग्रामीण रूग्णालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क आदी विकासकामांसह मधुमक्षिका पालनाशी संबंधित कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन युनिट, कुक्कुट पालन व दुग्धव्यवसाय प्रकल्प, पोंभर्णासाठी स्वतंत्र वन परिक्षेत्राची निर्मिती, एमआयडीसी असे विविध प्रकल्पसुध्दा मंजूर करण्यात आले आहे. पोंभुर्णा शहरात अत्याधुनिक बस स्थानकाचे बांधकामसुध्दा प्रगतीपथावर आहे. पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर मंदीर परिसरात पर्यटन विषयक विकासकामांना मंजुरी मिळाल्यामुळे या शहराच्या सौंदर्यात अधिक भर घातली जाणार आहे.
पोंभुर्णाच्या राजराजेश्वर देवस्थान विकासासाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:31 AM
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान येथील दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. किमतीच्या पर्यटन विषयक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती : सव्वा दोन कोटीतून पर्यटन विकास