शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

नगरपंचायतींच्या 303 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 5:00 AM

प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ६७ टक्के मतदान झाले. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतींमधील एकूण ८२ जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या ३०३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी सायंकाळी ५. ३० वाजता ईव्हीएम मशीनबंद झाले. या निवडणुकीत ७९.१९ टक्के मतदान झाले. ३७ हजार ४५९ मतदारांपैकी २८ हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ओबीसी प्रभागातील खुल्या झालेल्या २० जागांची निवडणूक झाल्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनासह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने साऱ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ६७ टक्के मतदान झाले. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. 

सिंदेवाहीत दुपारनंतर मतदान केंद्रात गर्दीसिंदेवाही : सिंदेवाही नगर पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून कोणतेही गालबोट न लागता शांततेत मतदान पार पडले. एकूण ७५.९९ टक्के मतदान झाले. १४ प्रभागात ६६ उमेदवार उभे आहेत. सकाळी मतदानासाठी फारसे नागरिक आले नाही. सायंकाळी मात्र मतदानासाठी नागरिकांची केंद्रावर गर्दी झाली. सिंदेवाही-लोनवाही निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, बीएसपी, आम आदमी पार्टी, अपक्ष पक्षांनी निवडणूक लढविली. शहरात सकाळपासूनच पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच आमदार बंटी भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस विभागाचा तगडा बंदोबस्त होता.

जिवतीत नगरपंचायतमधील १३ प्रभागाच्या १३ केंद्रांवर २ हजार ३७४ जणांचे मतदानजिवती : स्थानीक नगरपंचायत निवडणुकीतील आज झालेल्या १७ पैकी १३ प्रभागात निवडणुक पार पडली, त्यात उभ्या असलेल्या उमेदवाराचीही धाकधूक वाढत निवडणुकीची सांगता झाली. जिवती नगर पंचायत येथिल मतदान पार पडली. ३१६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत १३ प्रभागातील उभ्या असलेल्या ३४ उमेदवारांसाठी निवडणूक शांततेत पार पडली पण यात अनेक मतदार हे कर्मचारी असून त्यांची बदली होऊन बाहेर गावी गेलेला अवधी पाच वर्षाचा झाला अशाही लोकांना उमेदवारांनी बोलाऊन आज निवडणुकीत एक वेगळाच रंग भरला. परंतू शहरातील आजची निवडणूक शांततेत पार पडली हे विशेष आहे. जिल्ह्यातील छोट्याशा शहरात झालेल्या नगरंचायतीच्या निवडणुकीला कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थित पार पडली.

गोंडपिपरी येथे शांततेत मतदानगोंडपिपरी : येथील नगरपंचायतीच्या १४ प्रभागांतील ६९ उमेदवारांचे भाग्य आज मशीन बंद झाले . मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही. मागील निवडणुकीपेक्षा यंदा सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांचा जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले. मतदान केंद्राच्या काही अंतरावर मतदार याद्या व स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. मागील निवडणुकीतील झालेली गैरसोय यंदा टळली.

नागरिकांना आता निकालाची प्रतीक्षापोंभूर्णा : नगरपंचायतची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. १३ प्रभागासाठी ३ हजार ९ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी ३ वाजतानंतर मतदानासाठी केंद्रांत माेठी गर्दी झाली होती. ८०.२० टक्के मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. निवडणुकीमुळे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ७ अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी तैनात केले होते.

सावलीत तगडा पोलीस बंदोबस्तसावली : नगरपंचायतीत १७ जागांसाठी आज शांततेत मतदान झाले. ४५ उमेदवार राजकीय भवितव्य अजमावत आहेत. निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. प्रचारासाठी प्रत्येक प्रभागात सभा लावल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे सावलीत तगडा पोलीस बंदोबस्त होता. आता सर्वांचे लक्ष मतमाेजणीकडे लागले आहे.

कोरपनात २ हजार ९९६ जणांनी केले मतदान कोरपना : कोरपना नगरपंचायतची दुसरी सार्वत्रिक निवडणूक मंगळवारी पार पडली. यात ८७.८१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १४ प्रभागासाठी २८ उमेदवार रिंगणात होते. येथे ३ हजार ४१२ मतदार होते. यापैकी १५५१ पुरुष, १४४५ महिला असे एकूण २,९९६ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौकात मोठा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होता. निवडणूक प्रक्रियेवर उपविभागीय अधिकारी खलाटे, तहसीलदार वाकलेकर, मुख्याधिकारी शेळकी आदी अधिकारी लक्ष ठेवून होते.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या