शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अतिक्रमण हटाव मोहिमेवरून सभेत गदारोळ

By admin | Published: January 22, 2017 12:50 AM

क्रांती नगरीतील वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

विरोधकांचा बैठा सत्याग्रह : दोन सत्ताधारी नगरसेवकांचाही पाठिंबाचिमूर : क्रांती नगरीतील वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याबाबत ठरावही सभागृहात घेण्यात आला नाही व याकरिता विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे शनिवारला सभागृहात सर्वसाधारण विशेष सभा बोलावण्यात आली. सभा सुरू होताच विरोधकांनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ करीत बैठा सत्याग्रह केला. त्यामुळे अध्यक्षा शिल्पा राचलवार यांनी सभा तहकूब केली.चिमूर नगर परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. याचे द्योतक शहरातील अतिक्रमण हटवण्याबाबतचा ठराव सभेत न ठेवता परस्पर मुख्याधिकारी व काही सदस्यांनी स्वमर्जीने अतिक्रमण हटविण्याचा फार्स केला. त्यात फक्त भाजीपाल्याची गुजरी हटविण्यात आली. मात्र शहरातील अतिक्रमण हटविले नाही. याचा निषेध म्हणून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातील सर्वसाधारण सभेत खाली बसून निषेध व्यक्त करीत सभा तहकुब करण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडले.नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारला न.प. च्या सभागृहात घेण्यात आली. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. सभा सुरू होताच मागील सभेचे इत्तीवृत्त वाचून कायम करण्यास सुरू असतानाच काही मुद्दे हेतुपुरस्सर बाजुला सारले जात होते. त्यात काही सदस्यांनी आक्षेप घेतला, तेव्हा यावर सत्ताधाऱ्यांनी चर्चा करण्यास नकार दिला.याचा नगरसेवकांनी निषेध व्यक्त करीत सभागृहातच खाली बसून बैठा सत्याग्रह करीत गदारोळ केला. या सत्याग्रहात गटनेते अब्दुल कदीर शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक विनोद ढाकुणकर, अ‍ॅड. अरुण दुधनकर, गोपाल झाडे, कल्पना इंदूरकर, सिमा बुटले, उमेश हिंगे या विरोधकासह सत्ताधारी गटातील सतिश जाधव व माजी सभापती तुषार काळे यांनीही सभा तहकुब करण्यास विरोधकास मदत केली.सभेला मुख्याधिकारी मनोज शहा गैरहजर असल्याने सत्ताधारी विरोधकांना उत्तर देऊ शकले नाहीत. यामध्ये भाजी मार्केट (गुजरी) ऐतिहासिक किल्ल्यावर भरविण्यात येत आहे. यासाठी सभागृहाची मंजुरी घेतली नाही. यावर विरोधकासह सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत या अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेध केला. (तालुका प्रतिनिधी)