चंद्रपूर : महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर महापुरुषांनी त्याग, बलिदान दिले. त्या त्यागातून देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाला उभा करण्यात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे मत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त गांधी चौकात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची उपस्थिती होती.
यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीसुद्धा देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी दिलेले बलिदान देश कधीही विसरणार नसल्याचे सांगितले.
यावेळी संविधानाची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक नंदू खनके, संचालन आक्केवार यांनी केले.