शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Ganesh Chaturthi 2018; चंद्रपुरात समलैंगिकांचा गणेशोत्सव; स्वातंत्र्याचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:13 AM

चंद्रपुरात लेस्बियन गे बायोसेक्सुअल टान्सजेंडर (एलजीबीटी) हा समुदाय दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे११०० सदस्यगे, लेस्बियन व किन्नर यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समलैंगिकतेला गुन्हा ठरविणारा दीडशे वर्ष जुना कायदा सहमतीने झालेल्या कोणत्याही वर्तनाबाबत गैरलागू ठरविताना सर्वोच्च न्यायालयाने दंडसंहितेतील कलम ३७७ रद्दबातल ठरविले. या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून स्थानिक लेस्बियन गे बायोसेक्सुअल टान्सजेंडर (एलजीबीटी) हा समुदाय दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या समुदायाची संबोधन ट्रस्ट ही संस्था आहे. चंद्रपूरकर या संस्थेबाबत अनभिज्ञ असावे. गे समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या राज काचोळे या तरूणाने २०११ मध्ये ही संस्था स्थापना केली. संस्थेचे तब्बल ११०० सदस्य असून गे, लेस्बियन व किन्नर यांचा यात समावेश आहे.नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला, यवतमाळ येथेही संस्थेचे सदस्य आहेत. ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना ३७७ कलम रद्दबातल केले. हा निर्णय आम्हा सर्वांना स्वातंत्र्यासोबतच आनंद देणारा आहे.त्यामुळेच या गणेशोत्सवाचे वेगळे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने यावर्षी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून संस्थेच्या तुकूम येथील कार्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे, असे राज काचोळे यांनी सांगितले. यापूर्वी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी भेटता येत नव्हते. लोक आमची टिंगल करायचे. परंतु या निर्णयामुळे आम्हाला आता कुठेही भेटता येणार आहे. एकप्रकारचे स्वातंत्र्य मिळाले आहे. गणेशोत्सवानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच संस्थेच्या ११०० सदस्यांसाठी प्रा. डॉ. जयश्री कापसे गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबिर झाले.या शिबिराला समुपदेशक निरंजन मंगरूळकर, शारदा लोखंडे तथा वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाची आरोग्य,एड्स व गुप्तरोग तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८