बॉक्स
मन हलके करणे हाच उपाय
कुठल्याही प्रकारची चिंता जाणवत असल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधावा.
दररोज पुरेशी झोप घ्यावी.
नियमित व्यायाम व योगासने करावी. चुकीच्या गोष्टीकडे मन वळवू नये. आवडत्या गोष्टी करणे. जास्तच समस्या असल्यास मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
------
विविध प्रकारच्या संसाधनांमुळे संवाद लोप पावत आहे. त्यामुळे भावनांचा निचरा होत नाही. मार्गदर्शनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे अनेकांना डिप्रेशन आले आहे. जर आपण व्यक्त झालो नाही तर वाईट विचार येतात. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त होणे गरजेचे असते. कोणत्याही वयातील व्यक्तीमध्ये नैराश्य येऊ शकते. त्यामुळे आवडत्या गोष्टी करणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, जास्तच समस्या जाणवत असल्यास मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
डॉ. विवेक बांबोळे मानसिक रोग तज्ज्ञ, चंद्रपूर