प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील. अन्यथा परिस्थिती विपरित होणार. त्यामुळे गोवरी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली. या जलशुद्धीकरण प्लॉन्टचे गावकºयांनी स्वागत केले असून पाच रुपयात नागरिकांना कॅनभर पाणी मिळत असल्याने गावकºयांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. गावात पाण्याचे मुबलक साठे आहेत. परंतु गावकºयांना मिळणारे पाणी हे शुद्ध असावे, या हेतूने ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या मिळणाºया निधीतून नागरिकांसाठी गावातच जलशुद्धीकरण प्लॉन्ट उभारला. आरओ प्लान्ट सुरू झाल्याने पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी गावकºयांना मिळू लागले. आरओ मशिनच्या शुद्ध पाण्याच्या टाकीची धारण क्षमता दीड हजार लिटर आहे. या आरओ मशिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण एटीएम मशिनमधून पैसे काढतो, त्याचप्रमाणे नागरिकांनी आरओ मशिनला कार्ड दाखविल्यास एक कॅनभर म्हणजेच २० लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. जलशुद्धीकरणाकरिता ग्रामपंचायतीला जेमतेम साडेपाच लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती असते. बहुतांश आजार हे दूषित पाण्यातून होत असतात. त्यामुळे शुद्ध पाणी गावकºयांना मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्लॉन्टची निर्मिती केली आहे. या आरओ प्लान्टला गावकºयांचे चांगलेच सहकार्य मिळत आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे नागरिकांनी शुद्ध पाण्याचा पुरेपुर लाभ घ्यावा.जलशुद्धीकरण गावकºयांसाठी लाभदायीगावातील प्रत्येकच नागरिक शुद्ध पाण्याची मशिन बसवू शकत नाही. त्यामुळे हे जलशुध्दीकरण संयंत्र गावकºयांसाठी लाभदायी ठरत आहे. गोवरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतरही ग्रामपंचायतीने राबविला तर गावाचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होऊ शकते.प्रत्येकजण आरओ मशीन घेऊ शकत नाही. गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे , यासाठी जलशुद्धीकरण प्लान्टची निर्मिती करण्यात आली आहे. निरोगी आरोग्य राहण्यासाठी गावकºयांनी शुद्ध पाण्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य
ग्रामपंचायतीने साकारला जलशुद्धीकरण प्लान्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:28 AM
पाणी म्हणजे जीवन. सर्व जिवांची तहान भागविणारे जीवनामृत. मात्र ते शुद्ध असेल तर गावकºयांचे आरोग्य चांगले राहील.
ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायत: शुद्ध पाण्यामुळे गावकºयांचे आरोग्य सुदृढ