खडसंगी : पूर्वी प्रत्येकाच्या घरात चुली होत्या, त्यामुळे आता गावात गॅस सिलिंडर नसलेले घर क्वचितच पाहावयास मिळेल. पूर्वीच्या काळात स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर केला जात होता. त्यानंतर चुलीची जागा स्टोव्हने घेतली. चुलीच्या आगीने आणि स्टोव्हच्या भडक्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या चुली आणि स्टोव्ह हद्दपार झाला आहेत. त्याची जागा आता गॅस शेगडीने घेतली आहे. चिमूर तालुक्यात तब्बल १0 हजार गॅसचे ग्राहक आहे. त्यापैकी काही व्यावसायिक आहेत. प्रत्येक गृहिनींची पसंती गॅसला आहे. त्यामुळेच घर तिथे गॅस ही प्रथा सध्याच्या काळात ग्रामीण भागासह शहरात पहावयास मिळत आहे. जसा गॅसचा फायदा आहे तसाच त्याचा तोटाही आहे. मागील अनेक महिन्यात अनेक गावांसह, शहरात गॅसच्या गळतीने अनेक घराला आग लागुन अनेक महिलांना जीव गमावल्याच्या घटना घडला आहेत. काही भागात एका गॅस सिलिंडरमधुन दुसर्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे प्रकारसुद्धा केले जातात. सदर प्रकारही जिवाला धोका निर्माण करणारे ठरतात. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी स्फोट होऊन जीवित तथा आर्थिक हानी झाली आहे. यासर्व प्रकारामुळे अत्यंत गरजेचा ठरलेला गॅस गृहिणीसाठी गॅस गळतीची काळजी न घेतल्यास
गॅस सिलिंडर ठरतोय ‘बॉम्ब’
By admin | Published: May 24, 2014 11:29 PM