शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

गॅस सिलिंडरला लागली आग

By admin | Published: September 12, 2016 12:42 AM

शहरातील खंजी वॉर्ड येथील रहिवासी रमेश बोधे यांच्या घरी गणेशजींच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमादरम्यान स्वयंपाक सुरु असतांना...

वरोऱ्यातील घटना : नागरिकांच्या समयसूचकतेने मोठी हानी टळली वरोरा : शहरातील खंजी वॉर्ड येथील रहिवासी रमेश बोधे यांच्या घरी गणेशजींच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमादरम्यान स्वयंपाक सुरु असतांना गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. नागरिकांच्या समयसूचकतेने मोठी दुर्घटना टळली . खंजी वॉर्डातील बोधे कुटुंबाच्या घरी गणपती निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरा शेजारील कुटुंब या कार्यक्रमामध्ये सामील होते. त्या वेळेस घरघुती गॅस सिलिंडर सुरू केले असता अचानक आग लागली. या आगीमुळे एकाच घाबरगुंडी उडाली. या वेळेस वॉर्डातील सुज्ञ नागरिकांनी समयसूचकता दाखवून सदर सिलिंडरला बाजूला करून त्यावर ओले पोते टाकले. त्यानंतर समोरच्या मोकळ्या पटांगणातील पाण्याच्या डबक्यामध्ये सिलिंडर नेऊन टाकले. त्यामुळे ती आग विझली. परंतु तरीही मोठा स्फोट तर होणार नाही ना, या भीतीने नागरिकांनी त्वरित वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास दूरध्वनीवरून कळविले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटना स्थळ गाठून सदर सिलेंडरला विझवण्यात आले. त्यानंतर त्या सिलिंडरमधून गॅसचे बुडबुडे पाण्यात दिसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, पोलीस उपनिरीक्षक मुत्तेपोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनेदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित घातल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. त्याची माहिती मीनाक्षी गॅस एजंसी यांना देण्यात आली. तेथील कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर सिलिंडरला आग कशी लागली, याचा शोध एच. पी. कंपनीचे कर्मचारी घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)