लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचे भाव सातत्याने वाढत आहे. त्यातच आता पुन्हा २५ रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ९०७.५० पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असून त्यांना आर्थिक ताण आला आहे.एकीकडे सिलिंडरचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे सबसिडी कमी केली जात आहे. मागील आठ महिन्यामध्ये गॅस सिलिंडरचे भाव १६५ रुपयांनी वाढले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. त्यातच आता महागाईमुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे.
शहरात चुली कशा पेटवायच्या?केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजनेतून घराघरात गॅस सिलिंडर पोहोचविला आहे. महिलांच्या आरोग्यासाठी ही योजना चांगली आहे. आता सिलिंडरच्या किमती वाढवून पुन्हा महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आणली आहे. सरपणही मिळत नाही, जंगलात जाण्याची परवानगी नाही, अशावेळी महिलांनी काय करायचे, हा प्रश्न आहे.- मीरा रामटेके
मागील काही दिवसांपासून सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कसे जगावे, हा प्रश्न आहे. सिलिंडरचे दर वाढवायचे होते तर उज्ज्वलाची योजना सुरू करून महिलांना सिलिंडरवर स्वयंपाक करण्याची सवय का लावली. पूर्वी त्या चुलीवर स्वयंपाक करतच होत्या.- रिना सिडाम
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
जानेवारी महिन्यामध्ये ७४२ रुपयांमध्ये मिळणारे सिलिंडर ऑगस्ट महिन्यामध्ये ९०७ रुपयांवर पोहोचले आहे. मात्र सबसिडी कमी केली जात आहे. पूर्वी गॅस सिलिंडर शासनाकडून २५० रुपये सबसिडी दिली जायची. मात्र गेल्या दीड वर्षांपासून केवळ ४० रुपये सबसिडी दिली जात आहे.
छोट्या सिलिंडरचे दर उतरले