लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी लागते. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गोवरी गावालगतच वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. या गावाला लागूनच नाल्याच्या पलीकडे एक गुडा आहे. या गुड्यावर २० ते २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यात मजुरांचा समावेश आहे. येथील कामगार रोजगारासाठी इतरत्र कामावर जातात. त्यांनी आपली मुले गोवरी येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल केली आहे. मात्र गुडा ते गोवरी रस्ताच नाही त्यातच एक नालाही आहे. या नाल्यातूनच विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन शाळेत यावे लागते. एखाद्या दिवशी पावसाचा जोर राहिल्यास विद्यार्थ्यांना शाळेला बुट्टी मारावी लागते. या गुड्यातील १५ ते २० मुले सातवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी गोवरी येथे येतात. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नाल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे अनेकवेळा येथील विद्यार्थी जीव मुठीत घेवून नाला पार करून शाळात येतात. गोवरी येथील नागरिकांची नाल्याला लागून शेती असल्यामुळे त्यांनाही अनेकवेळा अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यामध्ये हा नाला भरून वाहत असल्यामुळे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांची मोठी फजीती होते. त्यामुळे या गुड्याला जोडणाºया रस्त्यावर पक्का रस्ता तसेच पुलाची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.बंधाऱ्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्षअनेक वर्षापासून येथील या विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नाल्याचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी येथील पालकांची आहे. या नाल्यावरील अनेक वर्षांपासून बंधाºयाचे काम अर्धवट आहे. हा बंधारा पूर्णत्वास आणून यावरुन मार्ग तयार केल्यास येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना गावात येण्यासाठी सोयीचा मार्ग होऊ शकतो. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोवरीगुंडा नागरिकांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:13 AM
गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी लागते.
ठळक मुद्देपक्क्या रस्त्याचा अभाव : नाल्याला पाणी आल्यास विद्यार्थी मारतात शाळेला बुट्टी