लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : द.पू.म.रेल्वे बिलासपूर विभागाचे महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांनी नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनची तपासणी केली. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांचे नागभीड रेल्वे स्टेशनवर आगमन होताच स्टेशन प्रबंधक मसराम, सहायक अभियंता पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सोहीन यांनी रेल्वे स्टेशनवरील उपहागृहाची चौकशी केली. स्टेशन परिसरात असलेल्या प्रत्येक विभागात जाऊन विभागवार माहिती घेतली. रेल्वेने नव्यानेच तयार केलेल्या बालोद्यानाचे उद्घाटन महाप्रबंधक सोहीन यांच्या हस्ते करण्यात आले. सोहीन यांनी यावेळी रनिंग रुम, रेल्वेच्या पोलीस ठाण्याचे, विश्रामगृहाचे निरीक्षण केले. यावेळी मंडळ प्रबंधक शोभना बंडोपाध्याय, आशुतोष श्रीवास्तव उपस्थित होते.खासदारांनीही घेतली भेटगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीही महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांची भेट घेऊन रखडत असलेल्या नागभीड - नागपूर , वडसा - गडचिरोली ब्रॉडगेज मार्गावर सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वेचे विभागीय सदस्य संजय गजपुरे, सचिन आकुलवार उपस्थित होते.विविध संघटनांची निवेदनेनागभीड स्टेशन परिसरातील विविध समस्यांच्या दृष्टीने येथील विविध संघटनांनी महाप्रबंधकांना निवेदन देऊन या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी केली. नागभीड - नागपूर नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे, दरभंगा एक्सप्रेसचा नागभीडला थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली. निवेदन देताना संजय गजपुरे, अर्चना समर्थ, सचिन आकूलवार आदी उपस्थित होते.
महाप्रबंधकांकडून रेल्वे स्टेशनची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:20 AM