लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रशायकीय इमारतींचा पायाभूत सुविधांसाठी उपयोग होऊ द्या, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शुक्रवारी येथे मूल शहरातील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये लिफ्ट असलेली तीन माळ्याची ही पहिली पंचायत समितीची इमारत पुढील वर्षभरात जनतेच्या सेवेमध्ये येणार आहे.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, सभापती ब्रिजभूषण पाझारे,गोदावरी केंद्रे, अर्चना जीवतोडे, संतोष तंगडपल्लीवार, पुजा डोहणे, चंदू मारगुलवार आदीसह परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.मूल येथील ही पंचायत समितीची इमारत अत्यंत देखणी आणि संपूर्ण जिल्ह्यात वेगळ्या स्वरूपाची उभारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या इमारतीला लिफ्टसुद्धा असणार आहे. एका वर्षामध्ये बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून तीन माळ्याची ही इमारत असणार आहे.सदर इमारतीमध्ये विविध विभागाकरीता प्रथम मजल्यावर सहा खोल्या व एक बैठक कक्ष असून त्यामध्ये सभापती ,उपसभापती कक्ष, सामान्य प्रशासन, शिक्षण व पंचायत विभागाच्या कार्यालयाचा समावेश आहे. दुस?्या मजल्यावर एका बैठकी करिता मोठे सभागृह व दहा खोल्यांच्या मध्ये संवर्ग विकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी ,पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा विभाग महिला व बालकल्याण विभाग या कार्यालयाचा अंतर्भाव आहे.
पायाभूत सुविधांचा उपयोग होऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:58 PM
प्रशायकीय इमारतींचा पायाभूत सुविधांसाठी उपयोग होऊ द्या, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शुक्रवारी येथे मूल शहरातील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये लिफ्ट असलेली तीन माळ्याची ही पहिली पंचायत समितीची इमारत पुढील वर्षभरात जनतेच्या सेवेमध्ये येणार आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मूल पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन