वामनराव चटप : विदर्भवाद्यांचा मेळावाचंद्रपूर : वेगळ्या विदर्भाची लढाई ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आपली शक्ती आणि आंदोलनाची गती पाहून विदर्भद्रोही चवताळले आहेत. त्यांचा संयम सुटत चालला आहे. ते आपल्यावर हल्ले करायला लागले आहेत. आपल्या सभा उधळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्या मुकाबला आपल्याला संघटित राहुन करावयाचा आहे आणि विदर्भ मिळवायचा आहे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी केले.चंद्रपूर येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात विदर्भवाद्यांच्या मेळाव्यात अॅड. चटप बोलत होते. हा मेळावा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विदर्भराज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, विदर्भ आझाद काँग्रेसचे अध्यक्ष अय्युबभाई कच्छी, नीळकंठराव कोरांगे, नितीन भागवत, प्रा. एस. टी. चिकटे, प्रभाकरराव दिवे, अशोक मुसळे, सीपीआयचे अनंता येरणे, डॉ. नामदेवराव कन्नाके आदींनी मार्गदर्शन केले. मंचावर प्रा. अनिल ठाकुरवार, सुभाष थोरात, प्रवीण मोरे, गोपी मिक्षा, कपिल इद्दे, रवींद्र गोखरे, अॅड. शरद कारेकार, मारोतराव काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार यांनी केले आणि संचालन सचिन आक्केवार यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सूरज गावंडे, सोनल येरेवार, अनुराधा बिर्लाबल, मंगला माडोरे, सुनील पानपट्टे, स्वप्निल नरूले, अमोल नेदुनवार, शांताराम पानघाटे, योगेश जाफराबादी, गोपी भानारकर, अनिकेत शेंडे, खेमराज उमरे, सूरज माडुरवार, शुभम डोंगरे, सागर यादव, अरशद कच्छी आदींनी परिश्रम घेतले. अखेरीस विदर्भवाद्याना शपथ दिल्यानंतर मेळाव्याची सांगता झाली. (प्रतिनिधी)
एकजुटीने विदर्भ मिळवा!
By admin | Published: September 23, 2016 1:07 AM