कोरोना काळात डॉक्टर, नर्स, पोलीस या कोरोना योद्ध्यांप्रमाणेच या महिलांनीसुद्धा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपले शहर आपली माणसे व सर्व जनता निरोगी राहावी या हेतूने अविरतपणे कचरा वाहून नेण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यासुद्धा कोरोना योद्धा आहेत. हे सामाजिक भान राखत इनरव्हील क्लबने या महिलांचा सत्कार केला. विवेकनगर मुल रोड येथील श्री राममंदिर परिसरात या महिलांना सुंदर आणि उपयोगी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल डॉक्टर बुक्कावार आणि डॉक्टर मोहुर्ले यांनी मार्गदर्शन केले, तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक विरंगुळा म्हणून त्यांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले आणि विजेत्यांना बक्षिसेसुद्धा देण्यात आली. पोषण आहार सप्ताहाची सुरुवात याच दिवशी झाल्यामुळे या महिलांना राजगिरा लाडू व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक क्लब अध्यक्ष डॉ. शीतल बुक्कावार यांनी केले. यावेळी सचिव सोनल बुक्कावार, वर्षा कोतपल्लीवार, अश्विनी रघुशे, मीना अंजीकर, अर्चना राऊतमारे, मंजूषा भास्करवार, डॉ. भावना मोहुर्ले, स्वाती बेत्तावार, श्वेता चेपूरवार आदींची उपस्थिती होती.
080921\img-20210908-wa0022.jpg
सफाई कामगार महिलांचा सत्कार करताना ईनरव्हील क्लब चांदफोर्टचे पदाधिकारी.