चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत शहरात जिल्हा परिषदेच्या तीन शाळा आहे. यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जटपुरा गेटची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९१८ मध्ये करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या या शाळेतून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या शाळेमध्ये मध्यंतरी केवळ मुलींसाठीच प्रवेश दिल्या जात होता. त्यानंतर, येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. मात्र, योग्य नियोजन आणि सात्यत्याने दुर्लक्ष केल्यामुळे सध्या या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या रोडावली आहे. मात्र, इतिहासपूर्व काळापासून साक्ष देणाऱ्या आणि अगदी जटपुरा गेट परिसरात असलेल्या या शाळेसोबत अनेकांचे नाते जुळले आहे. सध्या या शाळेची इमारत जिल्हा परिषद प्रशासनाने निर्लेखित केली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना ज्युबिली हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, शाळा दूर पडत असल्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
शिक्षण समितीमध्ये उपस्थित केला प्रश्न
स्वातंत्र्योत्तर काळापासून असलेल्या या शाळेची देखभाल दुरुस्ती तसेच इतिहास जपण्यासाठी शिक्षण समितीच्या काही सदस्यांनी बैठकीमध्ये चर्चा घडवून आणली. मात्र या शाळेसंदर्भात अधिकारी पाहिजे तसे लक्ष देत नसल्याने शिक्षण समितीच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.बाॅक्स
शहरातील जि.प. शाळा
ज्युबिली हायस्कूल
सिटी प्राथमिक शाळा
जि.प. प्राथमिक शाळा, जटपुरा गेट
बाॅक्स
निर्लेखित होतपर्यंत दुर्लक्ष कसे?
इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि चंद्रपूर शहरातील अगदी मध्यभागी असलेल्या या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्ती, तसेच पेंटिंगसाठी लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र, अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर असलेल्या या शाळेला निर्लेखित होण्यापर्यंतची वेळ का आली, हा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.
बाक्स
या शाळेतून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. सध्या विद्यार्थी संख्या रोडावली असली, तरी परिसरातील गरीब, तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी येथे शाळेची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शाळेला बंद करू देणार नाही. काही दिवसांपूर्वी या शाळेच्या जागेवर व्यावसायिक गाळे तयार करण्याची चर्चा होती. त्यामुळेच या शाळेकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता असल्याचे मत येथील सामाजिक कार्यकर्ते महेश काहीलकर यांनी व्यक्त केले.
कोट
सध्या या शाळेला निर्लेखित करण्यात आले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना ज्युबिली हायस्कूलमध्ये पाठविण्यात आले आहे. शाळेची लवकरच दुरुस्ती करून, शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात येणार आहे.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.चंद्रपूर.