शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

सरकारचा राज्य घटना बदलविण्याचा घाट

By admin | Published: June 02, 2016 2:37 AM

भारतीय राज्य घटनेने समतावाद, बंधुत्व आणि उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे मुलभूत हक्क दिले आहेत.

प्रकाश आंबेडकर : विरोधाला सज्ज व्हाबल्लारपूर : भारतीय राज्य घटनेने समतावाद, बंधुत्व आणि उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे मुलभूत हक्क दिले आहेत. या राज्य घटनेमुळेच दलित, आदिवासी व बहुजन समाजाचे जीवनमान उंचावत आहे. अशी ही राज्यघटना बदलली पाहिजे, या प्रयत्नात प्रतिगामी विचाराची भाजपा सरकार प्रयत्नात आहे व त्याच दिशेने या सरकारची पावले पडत आहेत, असा आरोप करीत बहुजन समाजाने याकरिता सावध राहावे आणि राज्यघटना बदलू नये, याकरिता सर्वांनी विरोध करावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आंबेडकरी व बहुजन जनतेला केले.डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाबमचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कुशल मेश्राम हे होते.अ‍ॅड. आंबेडकर हे भाजपा सरकारवर शरसंघान करीत पुढे म्हणाले, या सरकारने केवळ मोहक घोषणा दिल्या. पण, प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काही पडले नाही. शेतकऱ्यांची स्थिती भयंकर वाईट आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव नाही. बेरोजगारी सारखी वाढत चाचली आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरले आहे. तरीही, आमच्या काळात संपन्नता नांदत असल्याने ते धादांत खोटे बोलत होते. हे सरकार बदलण्याची संधी २०१९ ला मिळणार आहे. देव देव म्हणणारे सरकार ठेवायचे की समता, बंधुत्व आणि विकासाला प्राधान्य देणारे सरकार आणायचे, ते आपणाला ठरवायचे आहे? ही मानसिकता आतापासूनच बनवा. भाजपा व काँग्रेस दोघांचीही मानसिकता सारखीच, लहान पक्षांना गिळकृंत करुन, आपले वर्चस्व कायम ठेवायचे अशी आहे. सत्ता प्राप्तीकरिता लहान पक्षांचे काही नेते त्यांना बळी पडत आहेत, असा टोला त्यांनी पदप्राप्तीकरिता लाचारी पत्करणाऱ्या नेत्यांना लगावला. खरा आंबेडकर वाद कुणालाच समजला नाही, असे म्हणत, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणे, भाषणातून त्यांचे विचार पेरणे आणि स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणून घेऊन घोषणा देणे. म्हणजे आंबेडकरवाद नव्हे तर त्यांचे विचार कृतीत उतरविले पाहिजेत. तरच, तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी ठरणार. तरुणांमध्ये कमालीची उर्मी असते. त्यांच्यात परिवर्तनाचा जोश असतो. आता, आंबेडकरी नेत्यांनी त्यांचे खांद्यावर धुरा यावी. आपण बाजूला व्हावे, असे वयस्क नेत्यांना सूचविले. शेवटी ते म्हणाले, आंबेडकरी चळवळ चालली व बोलली पाहिजे. लोकांच्या कल्याणाकरिता, अन्याय निर्मूलनाकरिता ती चालवावी. ही चळवळ माझी ही मानसिकता आंबेडकरी अनुयायींनी ठेवावी. हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करु या! रोहिदास राऊत, उमेश कडू, कविता गौरकार यांचीही भाषण झालीत. संचालन धीरज बांबोळे, प्रास्ताविक दिनेश दुपारे तर आभार प्रदर्शन प्रशांत झामरे यांनी केले. समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. (तालुका प्रतिनिधी)आंबेडकरी विचारधारांच्या संघटनामध्ये पडलेली शकले, याबाबत बोलत रिपब्लिकन पक्षाचे १८ व बामसेफचे एकूण ४२ तुकडे असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. नगर पालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत वॉर्डाऐवजी प्रभागवार निवडणूक घेणे म्हणजे लहान पक्षांना संपविणे होय. भाजपा व काँग्रेस हेच करीत येत आहे, असा आंबेडकर यांचा आरोप.