धाबा: कोरोनामुळे शासनाने जमावबंदी लादल्याने कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे यावर्षी धाबा येथील कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव हा थाटामाटाने न करता घटस्थापना करून जयंतीची सांगता करण्याचे योजिले होते.
रविवारी कोंडय्या महाराज जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सपत्नीक कोंडय्या महाराज जयंती महोत्सवाची घटस्थापना करण्यात आली.
पालखी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. घटस्थापना कार्यक्रमाला प्रामुख्याने नामदेव सांगडे, सरपंच देवीदास सातपुते, संतोष बंडावार, सचिन फुलझेले, अशोक रेचनकर, संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, किशोर अगस्ती, साईनाथ कोडापे, जितेंद्र गोहणे, बालाजी चनकापुरे, मोहन डोंगरे, अनुराग फुलझेले, आनंद कोडापे, नीलकंठ लखमापुरे, संजय झाडे, विजय एकोनकर, सुषमा विलास चंद्रागडे, रवींद्र बोरकुटे, कवडू कुबडे, अर्पणा अशोक रेचनकर, वैशाली कांताराम म्हशाखेत्री, विनोद भुरकुंडे, बाळू आत्राम, अशोक चद्रागडे, सुधाकर झाडे उपस्थित होते.