कर्मचारी नसल्याने इमारत दुर्लक्षित
सिंदेवाही : तालुक्याचे ठिकाणी असलेल्या घोडाझरी उपविभागीय कार्यालय येथील मुख्य अधिकारी कार्यालयाच्या कक्षाला उदळी लागून खराब होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही याकडे कुणाचेही लक्ष नाही.
पाटबंधारे विभागाचे घोडाझरी उपविभागीय कार्यालय १९८२ मध्ये कार्यान्वित झाले. तालुक्याच्या ठिकाणी घोडाझरी सिंचन कालवा मुख्य कार्यकारी विश्रामगृह होते. आता कार्यालय बनविण्यात आले आहे. घोडाझरी उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणजे एकेकाळची वैभवशाली वास्तू. मात्र आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे इंग्रजकालीन विश्रामगृह, कर्मचारी निवास मोडकळीस आलेले आहे. अनेक कर्मचारी परिसरात वास्तव्य करीत होते. आज या ठिकाणी वाघाचे व बिबट्याचे येणे जाणे सुरू असते . याच विश्रामगृहाला आता उपविभागीय कार्यालय बनविले आहे. कार्यालयातील मुख्य अभियंता उपविभागीय अधिकाऱ्याच्या कक्षाला उदळी लागली आहे. यामुळे दरवाजे मोडकडीस आले आहे. कार्यालयीन विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. नळाचे व पिण्याची पाणी व इतर सुविधा उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.