आॅनलाईन लोकमतघुग्घुस : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घुस शहराची लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी असून गावात प्रामुख्याने सहा वॉर्ड आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने काही वार्डांत आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहरात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील उद्योजक कंपन्यांकडून टँकरने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून समस्येकडे लक्ष वेधले आहे. घुग्घुस शहराला पाणीपुरवठा करणारी ग्राम पंचायत ची एकमेव योजना आहे. जीर्ण झालेली कॉलरी क्र.२ ची पाणी पुरवठा योजना निरुपयोगी ठरत आहेत. वेकोलिच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले. पण, पाणी शहरात पुरत नाही. यापूर्वी बरेच दिवस पाणी पुरवठा बंद होता. ग्राम पंचायतीच्या तत्कालीन सरपंच शोभा ठाकरे यांच्या कार्यकाळात सदस्यांनी आंदोलन केल्यांनतर योजना सुरू झाली. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता आली. योजनेच्या दुरूस्ती दरम्यान बोरवेलचे १९ पाईप मोटारसह बोरमध्ये पडले. तेव्हापासून पाणीपुरवठा योजना सुरू झालीच नाही. त्यामुळे अमराई वॉर्डामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अमराई, तिलक नगर, ड्रिमलँड सिटी, बैरम बाबानगर, नवीन वस्ती, साई नगर, सिद्धी विनायक नगर, केमिकल वॉर्ड या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील लोकांना ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ पुरेशी नाही. पाच-सहा दिवसांतून एक तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना साठवून ठेवलेले पाणी पिण्याची वेळ आली. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणीटंचाई दरम्यान येथील लॉयड, एसीसी, वेकोलिकडून चार महिने टँकरने पाणी पुरवठा केल्यास टंचाई दूर होवू शकते. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू कराअडीच वर्षांपासून बंद असलेली पाणी पुरवठा योजना सध्या बंद आहे. ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणारे पाणी सर्व वॉर्डांत पोहोचत नाही. त्यामुळे शहरातील अनेक वॉर्डांत आतापासूनच टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे राजू रेड्डी यांनी आ. विजय वड्डेटीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.