लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय सांस्कृतिक निधी (इन्टेक) दिल्ली द्वारा आयोजित ‘रुट टू रूट्स’ पोस्टर स्पर्धेमध्ये चांदा शिक्षण मंडळद्वारा संचालित हिंदी सिटी हायस्कूलमधील वर्ग ९ वीचा विद्यार्थी मो.गुलामअली मय्युद्दिन खान याने अव्वल स्थान मिळवून राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. कला शिक्षक प्रवीण निखारे यांनी मार्गदर्शन केले होते.भारतीय सांस्कृतिक निधी (इन्टेक)च्या ‘रुट टू रूट्स’ पोस्टर स्पर्धेत देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्थानिक परंपरा, वेशभूषा व कलापरंपरा दर्शविणारे चित्र रेखाटायचे होते. भारतातून १४ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यातील १५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. मो. गुलामअली मय्युद्दिन खान याने कलाशिक्षक प्रवीण निखारे यांच्या मार्गदर्शनात ‘गोंडवानाची महिला’ या विषयावर चित्र रेखाटले होते.भारतीय सांस्कृतिक निधी (इन्टेक) दिल्लीच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात जम्मू-काश्मिरचे राज्यपाल डॉ. कर्ण सिंह यांच्या हस्ते मो. गुलामअली मय्युद्दिन खान याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी इन्टेकचे अध्यक्ष निवृत्त मेजर जनरल एल.के. गुप्ता, सदस्य सचिव टी.टी. मिश्रा, वरिष्ठ सदस्य ओ.पी. जैन तसेच एचइएचच्या संचालक पूर्णिमा दत्त व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गुलामअली खान याला राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:24 PM