या प्रत्येक किटमध्ये दोन किलो मोट, दोन किलो चना, दोन किलो मुंग, दोन किलो बरबटी, दोन किलो वटाना, एक किलो नाचणी, एक किलो शेंगदाणे, एक किलो गूळ या साहित्याचा समावेश आहे. याप्रसंगी उद्घाटकीय मार्गदर्शन करताना सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे यांनी सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाच्या समस्येला हद्दपार करण्याचा आमदार सुभाष धोटे यांचा मानस असून, कुपोषणमुक्तीसाठी सेवा कलश फाउंडेशन कसोशीने प्रयत्न करणार आहे. यावेळी सभापती अंजना पवार, माजी जि. प. सदस्य भीमराव पाटील मडावी, माजी सभापती सुग्रीव गोतावडे, अशफाक शेख, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, सीताराम मडावी, उपसरपंच भीमराव पवार, विस्तार अधिकारी जगन्नाथ गारुळे उपस्थित होते.
120721\img-20210711-wa0164.jpg
सकस आहाराचे वाटप करताना मान्यवर