शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुली म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:35 AM

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही.

ठळक मुद्देनोकरीवालाच मुलगा हवा; मुलींसह आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या

परिमल डोहणे ।चंद्रपूर : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोर जावे लागत आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीकडे चालला आहे. त्याची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. मात्र पैसा हेच सर्वस्व समजणाºया मुलींचीही संख्या कमी नाही. त्यामुळे शेतकरी नवरा त्यांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे विवाहयोग्य मुली शेतकरी मुलाला कमी प्रतिष्ठेचे समजून शासकीय नोकरदाराला पसंती देत असून शेतकरी मुलाला चक्क नकार देत असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मुला मुलींचे लग्न आईवडिलांकडून ठरविण्यात येत होते. बºयाचदा मुला व मुलींचे विचारसुद्धा विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बहुतेक मुले व मुली स्वत: आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात. आता आॅनलाईनवर संकेतस्थळावर अनेक लग्न जुळविणाºया संस्था सुरु झाल्या आहे. त्यावर नोंदणी करुन अनेकजण आपला जोडीदार निवडत आहेत. तर विवाह मेळाव्यातूनसुद्धा लग्न जुळत आहेत.मात्र संकेतस्थाळावर किंवा विवाह मेळाव्यात मुलींनी नोंदविलेल्या अपेक्षा बघितल्या तर त्यांना सरकारी नोकरदार मुलगा पाहीजे, तर शहरातील उच्च शिक्षित मुलींना परदेशातील मोठा पगार कमवणारा नवरा हवा आहे. काही मुलींना व्यावसायिक किंवा खासगी ठिकाणी नोकरीवर असलेल्या मुलालासुद्धा पसंती दर्शविली आहे. मात्र अनेक मुलींनी चक्क शेतकरी मुलाला नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच मुलांनीसुद्धा रंग, रुपापेक्षा कमवत्या मुलीला अधिक पसंती दिली आहे. बहुतांश मुलींकडून तर मुलाच्या घरी शेती असावी, मात्र तो शेतकरी नसावा, अशा अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहेत.उच्च शिक्षण घेऊनही अनेक मुलांनी शेतीला पसंती देत आर्थिक सक्षमता मिळवली आहे. अनेकांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत स्वत: व स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक स्थोर्य मिळविणाºया युवकांची संख्याही प्रचंढ वाढताना दिसून येत आहे. एककीडे तरुणांमध्ये शेतीबद्दल सकारात्मकता वाढताना विवाहएच्छूक मुलींमध्ये व त्यांच्या वडिलांमध्ये शेतकरी मुलांबद्दल व शेतकºयाबद्ल नकारात्मक्ता वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. शेतकºयाला उभा जगाचा पोशिंदा समजले जाते. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी अशी समजूत होते. पण आता निसर्गाच्या दृश्चक्राने परिस्थिती बदलली आहे. उत्पन्न योग्य होत नाही, पिकाला भाव नाही, शेतात राब-राब राबूनही योग्य फळ मिळत नसल्यामुळे आर्थिक स्थिती ठासळत आहे. त्याउलट शासकीय नोकरदाराच्या वेतनामध्ये प्रचंढ वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती अशी धारणा बनली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करुन प्रगत शेतकरी ठरले आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या अर्धागिणीची भक्कम साथ लाभली आहे.दिवसेंदिवस मुलींच्या अपेक्षा वाढत आहेत. शहरातील मुलींना तर चक्क फॉरेनमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करणाºया मुलाची अपेक्षा आहे. मुलाच्या घरी शेती असावी, मात्र मुलगा हा पूर्णवेळ शेतकरी नसावा, अशी आगडीवेगळी अपेक्षा मुलींकडून व्यक्त होत आहे. त्यासोबतच मुलगा हा निर्व्यसनी असावा, कुटुंबापासून विभक्त राहणार असाव्या, अशा अपेक्षा व्यक्त होत असल्याची माहिती अमोली फाऊंडेशनच्या वैशाली दुर्योधन यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती