ब्रह्मपुरी : सन २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने मुस्लिम समजाला आरक्षण घोषित केले होते.त्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतरच्या सरकारने ते आरक्षण रद्द केले. त्यामुळे आता नव्या महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी मुस्लिम बांधवानी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. डॉ. महेमदुर रहमान कमेटीने आपल्या अहवालात मुस्लिम समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात अतिशय मागासलेला असल्याने आरक्षण देन्याची शिफारस केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी इसरायिल खान, इकबाल भाई जेसानी, वकार खान, गाजी पटेल, अजमत खान, जमील खान, सज्जाद अली जीवानी, प्रा. नुरुल अंसारी आदी उपस्थित होते.
मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:43 AM