आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या निराकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रलंबित मागणी आपण पूर्ण करू शकलो. याचे समाधान वाटते. आजवर आॅटोरिक्षा चालकांच्या अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची शर्थ केली. आॅटोरिक्षा चालकांना अतिशय कमी दरात म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याच्या मागणीचा शासन गंभीरपणे विचार करत असून ही मागणीसुध्दा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.चंद्रपुरात आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केल्याबद्दल संघटनेतर्फे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे राजेंद्र खांडेकर, हरीश पवार, भारत लहामगे, राजू पडगेलवार, अब्बास भाई, बाळू उपलेंचीवार, बंटी मालेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण नेहमीच संघटनेसोबत राहिलो आहोत. पूर्वीच्या सरकारने आॅटोरिक्षा चालकांच्या वाहन करात मोठी वाढ केली होती. विधानसभेच्या माध्यमातून संघर्ष करून ही वाढ कमी करीत पुढील दहा वर्षे वाहन करात कोणतीही वाढ होणार नाही, असे आश्वासन आपण सरकारकडून घेतले. आॅटोरिक्षा चालकांवर लादण्यात आलेला व्यवसाय कर रद्द करण्यासाठी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा व्यवसाय कर मागे घेण्यास आपण शासनाला भाग पाडले. यापुढील काळातही आॅटोरिक्षा चालकांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण सदैव त्यांच्यासोबत राहू, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक राजेंद्र खांडेकर यांनी केले.
आॅटोरिक्षा चालकांना अल्पदरात घरे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:35 PM
आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या निराकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रलंबित मागणी आपण पूर्ण करू शकलो. याचे समाधान वाटते.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : कल्याणकारी मंडळ स्थापन केल्यामुळे जाहीर सत्कार