लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांमुलींकरिता लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. त्यानुसार या मोहीमेचा लाभ सर्व बालकांना मिळाव्या यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प.च्या मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या कार्यशाळेत करण्यात आले.शासनातर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाºया गोवर रुबेला मोहिमेसंदर्भात आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत जिल्हयातील सर्व आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, वैद्यकीय अधीकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक यांची गोवर रुबेला बाबत जागरुकता कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी, डॉ. संदीप गेडाम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम उपस्थित होते.सदर मोहिम जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी शाळा, मदरसे, खाजगी शाळा, अंगणवाडी केंद्र या ठिकाणी राबविण्यात येणार असल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
लसीकरणाचा लाभ सर्व बालकांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 10:37 PM
भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांमुलींकरिता लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. त्यानुसार या मोहीमेचा लाभ सर्व बालकांना मिळाव्या यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प.च्या मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या कार्यशाळेत करण्यात आले.
ठळक मुद्देकार्यशाळा : आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन