शेतकऱ्यांचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरीसुद्धा दीड वर्षापासून कोरोनाच्या सावटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडला आहे. चालू हंगामात शेती कशी करायची या अडचणीत शेतकरी आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करून दि महाराष्ट्र स्टेट को ऑप. मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी संस्था यांनी आधारभूत किमतीने शेतकऱ्यांचा धान खरेदी केला. दरम्यान सरकारने धानाचे बोनस प्रलंबित ठेवले. सरकार प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देणार आहे. सरकारने फेर विचार करून शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता ७०० रुपयांऐवजी एक हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे डॉ सतीश वारजुकर यांनी सरकारकडे केली आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादकांना हजार रुपये बोनस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:20 AM