लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे, ही बाब सामाजिक दायित्वाचा अविभाज्य भाग आहे. अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, आरोग्य सुविधा, शिक्षण, भूमीहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर तो कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे खाण प्रभावित सर्व गावांना न्याय देण्यासाठी भरघोस सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाºयांना दिले.वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत राजुरा तालुक्यातील साखरी गावात तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण कामाचे व येथील नळ योजनेचा प्रारंभ ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. अॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, बल्लारपूर वेकोलि क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक सिंग, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, जिल्हा किसान आघाडीचे सरचिटणीस राजू घरोटे, जि.प. सदस्य सुनील उरकुडे, सरपंच भाऊजी कोडापे, काशिनाथ गोरे, मनोहर पोडे, मोतीराम गोरे, धर्मराव उरकुडे, सुरेश पोडे, किसन कावडे, रामचंद्र कावडे, संजय गोरे, सुरेखा गोरे, हरिदास बोबडे आदी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणाºया मोबदल्यात एक रूपयाही कमी होवू देणार नाही, असा पुनरूच्चार केला. वेकोलिने सामाजिक दायित्व निधीतून तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण कामासाठी १९ लाख रूपये व ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजनेकरिता ४० लाख रूपये उपलब्ध करून दिले. क्षेत्रिय महाप्रबंधक सिंग यांनी वेकोलि प्रबंधनाद्वारे विकास विषयक आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातून घेतला.कार्यक्रमात १५ लाभार्थी महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत ना. अहीर, आ. संजय धोटे व गॅस एजन्सीचे प्रबंधक वाघुजी गेडाम यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
वेकालि खाण प्रभावित गावांना सीएसआर निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:26 AM
कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे, ही बाब सामाजिक दायित्वाचा अविभाज्य भाग आहे. अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, आरोग्य सुविधा, शिक्षण, भूमीहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर तो कर्तव्याचा भाग आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर : साखरी गावात तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाला सुरुवात