शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

कनार्टका एम्टा, डागा व बैद्यनाथ खाणी वेकोलिला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:56 PM

भद्रावती तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या कर्नाटक एम्टा, डागा व विंजासन येथील प्रस्तावित बैद्यनाथ कोळसा खदान या तीनही खासगी कोळसा खदानी सुरू करून वेकोलिला हस्तांतरित करून देण्यात याव्या, तसेच वेकोलित कार्यरत कामगारांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : माजरीतील कार्यप्रणालीची सीबीआय चौकशी व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या कर्नाटक एम्टा, डागा व विंजासन येथील प्रस्तावित बैद्यनाथ कोळसा खदान या तीनही खासगी कोळसा खदानी सुरू करून वेकोलिला हस्तांतरित करून देण्यात याव्या, तसेच वेकोलित कार्यरत कामगारांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावे. यासाठी वेकोलितील पाचही कामगार संघटनांनी आंदोलन करणे गरजेचे असून या प्रक्रियेत मी तुमच्या पाठीशी असून शासनही तुम्हाला मदत करेल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलितील पाचही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.स्थानिक विश्रामगृहात वेकोलितील कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन केले होते. जुना कुनाडा कोळसा खाणीतील ठेकेदार संबंधित मशीन घेवून निघून गेला. परंतु वेकोलि व्यवस्थापनाद्वारे याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच एकोणा कोळसा खदानीत ठेकेदाराद्वारे काम सुरू असून तेथील ठेकेदार अपेक्षेप्रमाणे काम करीत नाही. वेकोलि व्यवस्थापन तेथील ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. वेकोलि व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर यामुळे संशय निर्माण होत आहे. त्यामुळे माजरी क्षेत्र वेकोलिच्या कार्यप्रणालीबाबत सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, असे ना. अहीर म्हणाले.ज्या क्षेत्रातील कामगार त्याच क्षेत्रात राहिला पाहिजे, स्वेच्छेने कोणी बाहेर जात असेल तर ठिक. त्याबाबत वेकोलिने सर्वप्रथम तशी नोटीस लावणे गरजेचे आहे.वेकोलि माजरी क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांना घेवून तेथील इंटक, बिएमएस, एचएमएस, आयटक, सिटु या पाचही कामगार संघटनाद्वारे ना. हंसराज अहीर यांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ना. हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात या समस्यांबाबत ८ सप्टेंबरला नागपूर वेकोलि मुख्यालयात वेकोलि सिएमडी सोबत बैठक झाली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला पुन्हा सिएमडीसोबत बैठक झाली. वेकोलिची नकारात्मकता लक्षात घेवून या बैठकीचे आयोजन करून वेकोलि संघटनांनी वेकोलि विरोधात एलगार पुकारला आहे. या बैठकीला माजरी क्षेत्रातील इंटकचे सचिव धनंजय गुंडावार, कार्यकारी अध्यक्ष संजय दुबे, बिएमएस अध्यक्ष मोरेश्वर आवारी, अध्यक्ष कन्हैया रहांगडाले, वसंत सातभाई, आयटकचे अध्यक्ष धरमपाल, सचिव अनिल वरूटकर, एचएमएसचे सचिव दत्ता कोंबे, रहांगडाले आदी उपस्थित होते.आतापर्यंत ९०० कामगारांचे स्थानांतरणमाजरी क्षेत्रातील चार कोळसा खदानी बंद झाल्या आहेत. ओवीचा बेंच कोसळल्याने जुना कुनाडा, कोळसा संपल्याने नवीन कुनाडा, चालु स्थितीत असलेली तेलवासा खदान व आयुध निर्माणीची पाईप लाईन असल्याने ढोरवासा खदान वेकोलिने बंद केल्या आहे. तेलवासा, जुना कुनाडा, ढोरवासा खदानीत आजही कोळसा असल्याने त्या खदानी त्वरित सुरू करण्यात याव्या व एकोणा खदान ठेकेदारांच्या ऐवजी वेकोलि व्यवस्थपनाद्वारे चालविण्यात यावी, अशी कामगार संघटनांची मागणी आहे. बंद झालेल्या कोळसा खदानीतील अतिरिक्त ठरलेले कामगार क्षेत्राच्या बाहेर पाठविण्यात येत आहे. याबाबत कामगार संघटनांचा विरोध आहे. २०१२ पासून आतापर्यंत जवळपास ९०० कामगारांचे स्थानांतरण झाले आहे.