बल्लारपूर : कोविड-१९ या महामारी आजाराच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक झालेली आहे. आजही कोणतीही सुधारणा झालेली नाही, आजच्या काळात जनतेची नाही तर विद्युत विभागाचीसुद्धा आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांनी विद्युत बिल भरलेले नाही. त्या थकबाकीदारांना कोणतीही सूचना न देता विद्युत विभागाचे कर्मचारी ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कापत आहेत. मात्र हे चुकीचे असून वीज कापण्यापूर्वी कायदेशीर नोटीस वीज ग्राहकांना देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
विद्युत बिल थकबाकी असलेल्या ग्राहकांना त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी लेखी नोटीस ग्राहकांना देण्यात यावी, याकरिता बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहर यांच्यातर्फे म.रा.वि.म. वितरण विभाग बल्लारपूर येथे निवेदन देण्यात आले. यात उपस्थित बल्लारपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव देवतळे, शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमानी, उपाध्यक्ष आरिफ खान, महिला शहर अध्यक्ष अर्चना बुटले आदी उपस्थित होते.
230921\img-20210923-wa0210.jpg
निवेदन देताना कार्यकर्ते