चंद्रपूर : हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून कठोर कायदेसुद्धा करण्यात आले आहेत. मात्र तरीसुद्धा हुंड्यासाठी महिलांचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता हुंड्याचे स्वरूप बदलत असून पैसा, फ्लॅट, चारचाकी, दुचाकी, दागिने मागितले जात आहे. सासरच्या मंडळींच्या अपेक्षेमध्ये नवऱ्याला जणू विकतच घेतल्याचे दिसून येत आहे. अनाधिकाळापासून हुंडा पद्धतीला विरोध केला जात आहे. परंतु, बुरखा पांघरून जगणाऱ्या या व्यवस्थेत हुंडा पद्धतीला विरोध दर्शविला जात असला तरी नव्या पिढीतही हुंडापद्धती फोफावत असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला हुंडा नकोय; परंतु तुमच्या मुलीसाठी दागिने, तिला फिरण्यासाठी चारचाकी, राहण्यासाठी घर हवे, अशा मागण्या मुलीच्या वडिलांकडे करतात. लग्नाच्या वेळेस हुंडा न दिल्यास अनेकांचा छळ होत असल्याचे समोर येत आहे. सन २०१८ पासून आतापर्यंत जिल्ह्यात हुंडासाठी छळाच्या--- एवढ्या तक्रारी आल्या आहेत. तर हुंडाबंदीच्या--- घटना घडल्या आहेत. अनेक महिला कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेला घाबरून तक्रार करण्यास धजावत नाहीत. नाहीतर ही आकडेवारी अत्यंत भयावह आहे.
बॉक्स
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
हुंडा मागताना मुलाचे शिक्षण, नोकरी व्यवसायानुसार हुंडा मागितला जात असतो. उच्चशिक्षित व चांगल्या पदावर नोकरीवर असल्यास अधिक हुंड्याची मागणी केली जाते.
हुंडा म्हणून रोकड मागण्याऐवजी फ्लॅट, दागिने, चारचाकी मागितली जात आहे.
लग्नात होणारा खर्च, डीजेचा खर्च, वरातीतील वाहनाचा, मंगल कार्यालयाचा खर्च मुलीच्या वडिलांकडून मागितल्या जात आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही हुंडा मागण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
बॉक्स
अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांचा समावेश
हुंडा मागण्यामध्ये अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंतचा समावेश आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे वस्तू, दागिन्यांच्या स्वरूपात हुंडा मागितला जात आहे. विशेष म्हणजे अशिक्षितांच्या तुलनेत शिक्षित लोकांत हुंडा मागण्याचे प्रमाण अधिक आहे.
मुलाला नोकरी, परदेशात शिक्षण, व्यवसायासाठी म्हणून मुलीच्या वडिलांकडून पैशाची मागणी केली जात आहे.