ऑनलाईन लोकमतब्रह्मपुरी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत नहराच्या बांधकामाकरिता संपादीत केल्या होत्या़ सन २०१५ मध्ये जिल्हा समितीने विक्रीचे भाव निर्धारीत केले. त्यानुसार संपादीत शेतजमिनीची विक्री करण्यात आली. मात्र २०१५ नंतर दरवर्षी वाढीव भाव द्यावा, या सूचनेचे पालन करावे. या मागणीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना शेतकºयांनी साकडे घातले़२०१५ नंतर होणाऱ्या जमिनीच्या विक्रीला वाढीव भाव देण्याची व पिंपळगाव (भो.) ला लागून असलेल्या खामतळोधी रिठ उठीत गावालाही पिंपळगावचा दर लागू केला नाही़ त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला झाला, असा आरोप शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी केला़पिंपळगाव व भालेश्वर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी काळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, परिवहन मंत्री व जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडेही तक्रार केली आहे़ यासंबंधात पहिली बैठक पिंपळगाव (भो.) ग्रामपंचायत कार्यालयात १३ मार्च २०१८ ला पार पडली़ यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता बोबडे उपस्थित होते़ शेतकऱ्यांच्या वतीने भूसंपादीत जमिनीला वाढीव दर देण्यात यावा, ठराव सर्वानुमते घेण्यात आला़ त्यानंतर गोसेखुर्दचे कार्यकारी अभियंता हटवार यांच्याशी कार्यालयात चर्चा झाली. मात्र न्याय मिळाला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाºयांना साकडे घालून समस्येकडे लक्ष वेधले़ न्याय मिळाला नाही, तर आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, पांडुरंग ठेंगरे, नारायण दोनाडकर, जनार्दन दोनाडकर, माधव उरकुडे, विलास बेदरे, कौसल्या दोनाडकर, रमेश दोनाडकर, सुधीर दोनाडकर, अण्णा ठेंगरे, पांडुजी ठेंगरे, हिवराज दोनाडकर, पंढरी उरकुडे, प्रा. श्रीराम दोनाडकर, योगेश ठाकरे, भगवान रामटेके व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला वाढीव मोबदला द्या-शिवसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:19 AM