आॅनलाईन लोकमतकोठारी : कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करुन कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.कोठारी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने व वनहक्क समितीने अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे मिळावे यासाठी ठराव घेतला. नियमाप्रमाणे अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली. मात्र अद्याप स्थायी पट्टे मिळाले नाही. मागील ३० ते ४० वर्षापासून अतिक्रमीत जागेवर मशागत करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र प्राप्त अर्जाची व कागदपत्राची तपासणी करुन शासनाकडून विविध जाचक अटी लावून त्याची पूर्तक करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या. तीन पिढ्याचा पुरावा, वनविभागाचा चौकशी अहवाल व अन्य अटी नमूद करुन अतिक्रमणधारकांना वेढीस धरले जात आहे. बहुतेक अतिक्रमण २००५ पूर्वीचे आहे. काहींना तात्पुरते पट्टे देण्यात आले. मात्र स्थायी पट्ट्यासाठी संघर्ष सुरूच असल्याचे म्हटले आहे. निवेदन देताना वेणूदास खोब्रागडे, सुरेश वाढगुरे, महादेव काळे, भगवान गोरे, मनोहर गोंधळी, विभाकर मावलीकर व सुभाष वाडगुरे उपस्थित होते.उपोषणाचा इशाराकोठारी येथील अतिक्रमण धारकांना त्वरीत स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमण धारकांसह उपोषण करण्याचा इशारा संदीप मावलीकर यांनी दिला आहे.
अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:00 PM
कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करुन कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देजबरानज्योत शेतकऱ्यांत संताप : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन