लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत. त्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वी संपादित केलेल्या शेतमालकावर अन्याय होत असल्याने त्या शेतकऱ्यांनासुद्धा वाढीव मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील नऊ-दहा वर्षांपूर्वी नवरगाव परिसरात गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू करण्यात आले. तेव्हाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार गोसेखुर्द कार्यालय नागभीड विभाग क्रमांक ३ यांनी शेतजमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करून त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे २०१०-११ मध्ये काही शेतकऱ्यांना समजावून तर काहींवर दबाव टाकून शेतजमिनी संपादित केल्या. मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध करीत जमीन देण्यास नकार दिला. परिणामी उजव्या कालव्याचे काम अर्धवट झाले आहे. त्यावेळी संपादित केलेल्या जमिनी अत्यल्प भाव देण्यात आला. तर जमिनी संपादित केल्यामुळे शेतकºयांना दहा वर्षांपासून सदर जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. मात्र अलिकडे ज्या शेतकऱ्यांनी जमीन संपादित करीत आहेत. अशा शेतकºयांना शासनाने २०१८ मध्ये आजच्या बाजारभाव मुल्याने किंमत दिली. त्यावरही २५ टक्के वाढ दिली. त्यामुळे या शेतकऱ्यांना चारपट मोबदला दिला. मात्र पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांनाही आजच्या बाजारभावानुसार फरकाची रक्कम देवून विक्रीपत्र नोव्हेंबर महिन्यात द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी प्रकाश बावणकर, विनोद गहाणे, राजू लांजेवार, मनोहर गहाणे, गुलाब गायकवाड, मधुकर बन्सोड, गणपत गहाणे, अरविंद कामडी, विजय प्यारमवार आदी उपस्थित होते.
‘त्या’ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:39 PM
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोसेखुर्दच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची मागणी