आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेसाठी आ. नाना श्यामकुळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.धानोरा-पिपरी गावाजवळ वर्धा नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचे पाणी धारिवाल आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (एम.आय.डी.सी) येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्याच्या दुसºया बाजूला चिंचेला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, या योजनेपर्र्यंत आता पाणी पोहचणे कठीण झाले आहे. या योजनेवर परिसरातील पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या गावांना पाणीपुरवठा होता. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. नदीपात्र फारसे पाणी नाही. त्यामुळे उद्योगांकडून पाण्याची उचल अशीच सुरु राहिली, तर ही पाणीपुरवठा योजनाच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीतील पाण्यावर आधी पिण्यासाठी, कृषीसाठी आणि नंतर उद्योगांसाठी पाण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. श्यामकुळे यांनी पालकमंत्र्यांंना केली.पालकमंत्र्याचे निर्देशजिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत आ. श्यामकुळे यांनी पाण्याचा प्रश्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यां निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाºयांना या प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
‘त्या’ गावांना पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:56 PM
अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
ठळक मुद्देनाना श्यामकुळे : जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्र्यांना निवेदन