आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ब्रह्मपुरी शहरात आरोग्य धामाने प्रवेश केला आहे. शिक्षण आणि आरोग्य या जोडगोडीने ब्रह्मपुरीचे नाव पुन्हा पंचक्रोशित मोठे केल्याचे एका यशस्वी शस्त्रक्रियेने सिद्ध केले आहे.हिराजी उईके या रुग्णावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करुन आस्था नामक रूग्णालयाच्या डॉक्टरांनी नावाप्रमाणेच मेंदूवरही आस्था अबाधित ठेवली. गडचिरोली जिल्ह्यातील कºहाडी येथील हिराजी उईके (५२) हे ट्रॅक्टरला चाबी लावत असताना त्यांचे बोट सापडले. लगेच त्यांनी झटका दिला असता हिराजी सिमेंट रोडवर खाली कोसळले. या अपघातात हिराजीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने नागपूर व त्यापुढे उपचारासाठी जाण्याची त्यांची आर्थिकदृष्ट्या स्थिती नव्हती. त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी शहर गाठले.येथे नव्यानेच सुरु झालेल्या आस्था नामक रूग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांना हे एक आव्हानच होते. ब्रह्मपुरीत या प्रकारची सोय उपलब्ध नसताना डॉक्टरांनी धाडस केले. त्यांनी या शस्त्रक्रियेसाठी नागपूरवरुन न्युरोसर्जन डॉ. योगेश शेंडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुमित जयस्वाल, डॉ. पंजक लडके व त्यांच्या सहकाºयानी शस्त्रक्रिया करण्यास सुरु केली. एकीकडे रुग्णांवर योग्य उपचार होण्याचा दडपण तर दुसरीकडे शस्त्रक्रियेचा आवाहन, अशा द्विधा मनस्थितीत असताना शस्त्रक्रिया सुरु झाली.मात्र काही काळानंतर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अशा धाडसी शस्त्रक्रियेने ब्रह्मपुरीत रूग्णाला जीवनदान मिळाले. या यशस्वी शस्त्रक्रियेने रुग्णाचा परिवार एका मोठ्या आर्थिक व मानसिक संकटातून बाहेर पडल्याने ब्रह्मपुरी शहराचे नाव पुन्हा एकदा आरोग्यधाम असल्याचे सिद्ध झाले आहे.
मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेने मिळाले हिराजीला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:40 PM
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ब्रह्मपुरी शहरात आरोग्य धामाने प्रवेश केला आहे.
ठळक मुद्देब्रह्मपुरीतील डॉक्टरांना यश : आरोग्य नगरीची वाटचाल