लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : लोकमतने 'होय, मी शौचालय बांधले आत्मसन्मानासाठी' या मथळ्याखाली जागतिक शौचालय दिनी बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल थेट राज्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे संचालक राहुल साकोरे यांनी घेतली. सदर महिलेचा जागतिक शौचालय दिनीच सत्कार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्या. आणि त्या महिलेसह सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या एकूण ४० कुटुंबांचा ग्रामपंचायत बिबीने पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार केला.कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबीच्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाते. ग्रामपंचायतीने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून गावातील सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाºया ४० कुटुंबांचा सत्कार करून एक आगळा-वेगळा उपक्रम पार पाडला.बिबी ग्रामपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल असून दर रविवारी गावातील स्वच्छतादूत ग्रामसफाई करतात. गावात प्लास्टिक बंदीचे काटेकोर पालन केले जाते. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही घाण होणार नाही, याची दखल घेतली जाते. प्रत्येक गावाच्या विकासात अडसर ठरते ती वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची अव्यवस्था. मात्र बिबी ग्रामपंचायत याला अपवाद आहे. गावात बोटावर मोजण्याइतके वैयक्तिक शौचालय शिल्लक राहिले असून उर्वरित कुटुंब सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. सार्वजनिक ठिकाणी शौचास न बसता, सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असल्यामुळे गावाच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. गावात यावर्षी कोणत्याच रोगाने शिरकाव केलेला नाही. घरी शौचालय नसतानासुद्धा कसल्याही प्रकारची ओरड न करता सतत सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या ४० कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने बकेट व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सविता काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, बापूजी पिंपळकर, नामदेव ढवस, आनंद पावडे, रामदास देरकर, माजी सरपंच इंदिरा कोडापे, राजकुमार हेपट, रशिद शेख, झित्रु कापटे, किसन भडके, दादाजी भेसूरकर, श्रीरंग उरकुडे, रवींद्र देरकर, गिरधर आमने, ोकेश कोडापे, अतुल बांगडे, ग्रामपंचायतचे कर्मचारी सुनील कुरसंगे, अनिल मारटकर, मारोती घोडाम व इतर मान्यवर उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक उपसरपंच आशिष देरकर यांनी केले.बिबी येथील माधुरी दिवाकर खाडे यांच्या शौचालयाच्या भिंतीवर 'होय, मी शौचालय बांधले, स्वत:च्या पैशातून व माझ्या इज्जतीसाठी' असे नमूद करून सुंदर संदेश दिलेला आहे. हा संदेश अभिमानास्पद असून शौचालय नसलेल्या कुटुंबांनी बोध घेण्यासारखा आहे. अशा महिलेच्या सत्कारातून इतर लोकांच्या शौचालयाविषयी विचारांनासुद्धा चालना मिळेल.- राहुल साकोरे,संचालक, पाणी व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई
राज्याच्या संचालकांकडून ‘त्या’ महिलेचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:01 PM
लोकमतने 'होय, मी शौचालय बांधले आत्मसन्मानासाठी' या मथळ्याखाली जागतिक शौचालय दिनी बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल थेट राज्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे संचालक राहुल साकोरे यांनी घेतली.
ठळक मुद्देसार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या ४० कुटुंबांचा सत्कार