लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह विदर्भ, मराठवाड्यातील नागरिकांचे आराध्यदैवत म्हणजे माता महाकाली या प्राचीन मंदिराचे आता सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी अप्रतिम आराखडा जनतेच्या दरबारात ठेवण्यात आला. जनतेने तो मान्य केला. यामध्ये नागरिकांनी केलेल्या अनेक सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे सुशोभीकरण माता महाकाली मंदिराचे होणार आहे. मूळ मंदिराच्या गाभ्याला कुठलाही हात न लावता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तसेच भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी दूर गावावरुन येणाऱ्या लोकांना उत्तम आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.महाकाली मंदिरामध्ये प्रशस्त रस्ते, निवासस्थान, रस्त्यावरील दुकानांना वेगवेगळे दालन भव्य सभामंडप, तसेच बाहेरगावाहून येणाºया नागरिकांना दर्शनानंतर विसाव्यासाठी जागा, तसेच मंदिर परिसरातील सर्व भागाची अत्यंत नेत्रदीपक अशी सजावट करण्यात येणार आहे.त्यामुळे विदर्भात शेगावसारख्या प्रेक्षणीय तीर्थक्षेत्राप्रमाणे चंद्रपूरचे नावलौकिक होईल, अशाच पद्धतीची सेवा आणि सुविधा या नव्या आराखड्यात अधोरेखित आहे. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार केल्यामुळे महाकाली भक्तांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे.देवी महाकालीचे मंदिर हे चंद्रपूर जिल्ह्याची शान आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे प्रथमच या मंदिराचा विकास होऊन मंदिराचे सुशोभिकरण होत आहे. राज्यभरातील भाविक येथे येतात. त्यामुळे हा विकास आवश्यक होता.-दिलीप खेरकर, विसापूर.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील देवी महाकाली मंदिराचा विकास करण्याचा जो निर्णय घेतला, तो प्रशंसनीय आहे. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आवश्यक आहे.-मनोहर देऊळकर, नांदगाव.चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू आहे. या प्राचीन वास्तूच खरं तर चंद्रपूरची ओळख आहे. देवी महाकाली हे चंद्रपूरकरांचे आराध्य देैवत. दरवर्षी लाखो भाविक देवी महाकालीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या प्राचीन मंदिराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय आपण घेतला. याचा अप्रतिम आराखडा तयार करून जनतेसमोर ठेवला. जनतेने तो मान्य केला आहे. त्यामुळे लवकरच हा मंदिराचे सुशोभिकरण होणार आहे.-सुधीर मुनगंटीवार, अर्थ, नियोजन व वनेमंत्री,महाराष्टÑ शासन.
देवी महाकाली मंदिराचे होणार सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 6:00 AM
देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे सुशोभीकरण माता महाकाली मंदिराचे होणार आहे. मूळ मंदिराच्या गाभ्याला कुठलाही हात न लावता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तसेच भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी दूर गावावरुन येणाऱ्या लोकांना उत्तम आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
ठळक मुद्देआराखड्याला जनतेची मान्यता - सुधीर मुनगंटीवार